🛑कणकवली तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी भगवान लोके.
*🛑कणकवली तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी भगवान लोके.*
*🛑सचिवपदी संजय सावंत, खजिनदारपदी रोशन तांबे यांची निवड*
*🛑कार्यकारिणी बिनविरोध*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- २४:-* कणकवली तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक पुण्यनगरीचे जिल्हाप्रतिनिधी भगवान लोके यांची तर सचिवपदी संजय सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निरीक्षक तथा जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार अॅड. संतोष सावंत व जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारिणीचे सदस्य महेंद्र मातोंडकर यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहातील ही कार्यकारिणी निवडण्यात आली.
उपाध्यक्षपदी नंदू कोरगावकर, नितीन कदम, उमेश बुचडे, सचिन राणे, खजिनदारपदी रोशन तांबे, सहसचिवपदी दर्शन सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून उदय दुधवडकर, संजय बाणे, विनय सावंत, तुळशीदास कुडतरकर, उल्का तावडे, रंजिता तहसीलदार, तुषार हजारे यांची निवड करण्यात आली. तसेच जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष राऊळ, जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य लक्ष्मीकांत भावे यांची पालकसदस्य तर सल्लागार अशोक करंबेळकर, संतोष वायंगणकर यांची निवड करण्यात आली.
बैठकीला पत्रकार परिषद प्रदेश प्रतिनिधी गणेश जेठे, तालुकाध्यक्ष अजित सावंत, ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर तांबट, रमेश जोगळे, दिलीप हिंदळेकर, सचिव माणिक सावंत, खजिनदार योगेश गोडवे, उपाध्यक्ष अनिकेत उचले, चंद्रशेखर देसाई, वीरेंद्र चिंदरकर, राजन कदम, सुधीर राणे, भास्कर रासम, तुषार सावंत, राजेश सरकारे, मिलिंद पारकर, संजय राणे, पप्पू निमणकर, पंढरीनाथ गुरव, राजन चव्हाण, आनंद तांबे, रामाकांत बाणे, विशाल रेवडेकर, हेमंत वारंग, संयोग सावंत, गणेश पारकर, विनोद जाधव, शशिकांत सातवसे, किरण खाजवाडकर, विराज गोसावी, अस्मिता गिडाळे आदी उपस्थित होते. निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष भगवान लोके व सचिव संजय सावंत व नूतन कार्यकारिणीचे अॅड. संतोष सावंत, महेंद्र मातोंडकर, अजित सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी अशोक करंबेळकर, संतोष वायंगणकर, संतोष राऊळ, अजित सावंत यांनी मनोगत व्यक्त करताना नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा देत कार्यकारिणीने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून टीम चांगले काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यकारिणीच्या निवडीनंतर कणकवली तालुका पत्रकार संघाच्या सदस्यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष भगवान लोके व त्यांच्या टीमला पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. निवडीनंतर जम्मू-कश्मिरमधील पहलग्राम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना तालुका पत्रकार संघातर्फे श्रद्धांजली वाहिली. प्रास्ताविक अजित सावंत यांनी केले. आभार माणिक सावंत यांनी मानले.
चाैकट
कुटुंबाप्रमाणे पत्रकार संघ चालवणार – भगवान लोके
कणकवली तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी माझी दुसऱ्यांदा सर्वांनी बिनविरोध निवड केली. याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. अध्यक्षपदाच्या पहिल्या टर्ममध्ये मी आणि माझ्या टीमने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले होते. पत्रकारांचा कौटुंबीक स्नेहमेळावा ही आगळीवेगळी संकल्पना आम्ही सुरू केली होती. कणकवली तालुका पत्रकार समितीचे १०७ सदस्य आहेत. या सर्वांना विश्वासात घेऊन आमची नवीन टीम काम करणार आहे. सर्व सदस्य हेच अध्यक्ष आहेत, ही भूमिका माझी असेल. कुटुंब म्हणून पत्रकार संघ चालवला जाईल. कार्यकारिणीच्या बैठका न लावता सर्व सदस्यांच्या उपस्थितीत बैठका घेतल्या जातील. प्रत्येक सदस्याला अध्यक्षप्रमाणे सन्मान देण्याचे काम माझ्याकडून होईल. कणकवली तालुका पत्रकार संघ हा जिल्ह्यातील एक आदर्शवत पत्रकार संघ अोखळला जातो. माझ्या कारकीर्दीत कणकवली पत्रकार संघाची असलेली शान आणि बाण कामय राखून ती अधिकाधिक उंचावण्याचे प्रामाणिक प्रयत्न माझा आणि टीमचे असतील, असा विश्वास भगवान लोके यांनी व्यक्त केला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

