कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑आडाळी एमआयडीसी हद्दीत बेकायदेशीर मायनिंग उत्खनन

*🛑आडाळी एमआयडीसी हद्दीत बेकायदेशीर मायनिंग उत्खनन*

 

*🛑आर्थिक व्यवहारातून स्थानिक युवकाला मारहाण*

 

*🛑भाजप पक्ष स्थानिकांसोबत-महेश सारंग*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴दोडामार्ग, दि- २३:-* तालुक्यातील आडाळी एमआयडीसीत गेले कित्येक महिने जमीन सपाटीकरण करण्याच्या नावाखाली गोवा व जिल्ह्याभरातील खनिज तस्करी करणारे दलाल दादागिरी करून मोठ्या प्रमाणात दिवस-रात्र महसूल विभागाच्या आशीर्वादाने खनिज तस्करी करीत आहेत. आडाळी खनिज तस्करीवर कारवाई न झाल्यास भाजप रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी दिला आहे.

आडाळी एमआयडीसीत एमआयडीसीची जमीन सपाटीकरण करण्याच्या नावाखाली गेले कित्येक महिने गोवा राज्यातील दलाल काही स्थानिकांना हाताशी धरून मोठया प्रमाणात मायनिंग काढून बिनधास्त पणे रेडी येथे वाहतूक करीत आहेत. बाहेरील गुंड प्रवृत्तीचे दलाल स्थानिकांना मारहाण करून हजारो डंपर मायनिंगची माती खुलेआम वाहतूक करीत आहेत. या अगोदरही आडाळी एमआयडीसीमधील जमीन सपाटी-करणाखाली मायनिंग उत्खनन करून शासनाचा लखो रुपयांचा महसूल बुडून लाखो रुपये या बाहेरील गुंड प्रवृतीच्या युवकांनी कमावले आहेत.

आज आडाळी गावात उत्खनना-साठी बाहेरून आलेल्या गुंड प्रवृत्तीच्या युवकांची मायनिंग उत्खननाच्या आर्थिक व्यवहारातून स्थानिक युवकांना झालेल्या मारहाणीमुळे आडाळी गावात दहशत निर्माण झाली आहे. अशा गुंड प्रवृत्ती जर बळावत गेल्या तर दोडामार्ग बीड कधी होईल हे कळणार सुद्धा नाही. त्यामुळे संबंधित पोलीस यंत्रणा आणि महसूल विभागाने तात्काळ या गुंडांचा छडा लावावा आणि योग्य कार्यवाही करावी. जर गावात येऊन कोण दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असेल तर भाजप पक्ष कधीही गप्प बसणार नाही, असा इशारा महेश सारंग यांनी दिला आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!