कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑मळगाव-तेलकाटावाडी येथे रौप्य महोत्सवी नाट्यप्रयोग सादर

*🛑मळगाव-तेलकाटावाडी येथे रौप्य महोत्सवी नाट्यप्रयोग सादर*

 

*🛑सूयोग कला रगंमंच व तेलकाटावाडी मित्रमंडळाच्यावतीने नाट्यप्रयोगाचे आयोजन*

 

*🛑’कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी’ नाट्यप्रयोग सादर*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*

 

*🎴सावंतवाडी, दि- २३:-* मळगाव-तेलकाटावाडी येथील बाबी लातये यांच्या निवासस्थानी सोमवारी सूयोग कला रगंमंच व तेलकाटावाडी मित्रमंडळाच्यावतीने आयोजित रौप्य महोत्सवी नाट्यप्रयोग पार पडला. यनिमित्त या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त केक कापून व फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष व्यक्त करण्यात आला. यावेळी अमृतनाथ पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ म्हापण-वेंगुर्ला (मालक सुनील गोसावी) या नाट्यमंडळाचा विठ्ठल भक्तीवर आधारित ‘कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी’ हा पौराणिक नाट्यप्रयोग सादर करण्यात आला.

सूयोग कला रगंमंच व तेलकाटावाडी मित्रमंडळाची साल २००१ मध्ये स्थापना झाल्यापासून दरवर्षी वेगवेगळ्या दशावतार कंपनीचे नाट्यप्रयोग सादर केले जातात. नाट्यप्रयोगाचे यंदाचे हे २५ वे वर्ष आहे. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त केक कापून आनंदोत्सव व्यक्त करण्यात आला. यावेळी भाजप तालुका सदस्य सिद्धेश तेंडोलकर, ज्येष्ठ दशावतारी कलाकार व दिग्दर्शक तथा सूयोग मंडळाचे मार्गदर्शक बाबल नाईक, मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर मुळीक, भाजप १६० चे बुथ अध्यक्ष महेश गवंडे, तुषार वालावलकर, श्रीकृष्ण लातये, सागर सावळ, विश्वनाथ गोसावी, सहदेव राऊळ, प्रकाश गावडे, संतोष गावडे, उदय राऊळ, सुशांत परब, हेमनाथ गोसावी, स्वप्नील ठाकूर, पुरुषोत्तम राऊळ, शशांक गोसावी आदी उपस्थित होते. सूयोग कला रगंमंच व तेलकाटावाडी मित्रमंडळ आयोजित व अमृतनाथ पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ म्हापण-वेंगुर्ला प्रस्तुत कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी’ या नाट्यप्रयोगात अनिल गोसावी, करण खानोलकर, बाळू मांजरेकर, विनायक एरागी, दिनेश मराळ, पंढरीनाथ घाटकर, प्रशांत मेस्त्री, यश राणे, संदीप गावडे, समीर घाडी, दाजी मुंडये, चेतन कानडे, प्रशांत केरकर, सुरेश गोवेकर आदी कलाकारांनी उत्कृष्ट भुमिका साकारल्या. तर त्यांना हार्मोनियम-प्रकाश सावंत, पखवाज-संतोष गोसावी, तालरक्षक-नरेंद्र किनळेकर यांनी अप्रतिम संगीतसाथ केली. मळगाव तसेच परिसरातील नाट्यप्रेमींनी विठ्ठल भक्तीवर आधारित असलेल्या या नाट्यप्रयोगाचा लाभ घेतला.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!