दोडामार्गतील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गतच्या कामाना मिळणार गती
शिवसेना तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी घेतली कार्यकारी अभियंता यांची भेट
शासनाचा निधी मात्र वेळेत काम पूर्ण होण्यासाठी घेतली भेट
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
दोडामार्ग –
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत महत्वाकांक्षी कामे अर्धवट स्थितीत आहेत. शासन निधी देत असते मात्र प्रशासनाने जलद कामपूर्तीसाठी प्रयत्न करावेत यासाठी शिवसेना तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी कुडाळ येथे कार्यकारी अभियंता यांची भेट घेतली सविस्तर चर्चा केल्यानंतर अधिकाऱ्यांनी रस्ता कामे लवकरात लवकर पूर्ण करून देण्याची हमी दिली. शासनाचा निधी योग्य वेळेत खर्च होऊन जनतेला सेवा मिळाव्यात यासाठी ही भेट असल्याचे श्री. गवस यांनी सांगितले.
याबाबतची अधिक माहिती अशी की, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत दोडामार्ग तालुक्यातील अनेक कामे अर्धवट अवस्थेत आहेत काही कामे सुरू करण्यात आली नाहीत याबद्दल कार्यकारी अभियंता यांची कुडाळ कार्यालयात भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले याबद्दल जाबही विचारला. कामे येत्या आठवडाभरात सुरू करण्यात येणार असे अभिवचन देण्यात आले. यावेळेस श्री. गवस यांच्यासमवेत युवा सेना दोडामार्ग तालुकाप्रमुख भगवान गवस, परमे ग्रुप सोसायटी व्हाईस चेअरमन रामदास मेस्त्री, माजी सरपंच विनायक शेटय़े, सरपंच विशाखा नाईक, सरपंच जनार्दन गोरे, उपसरपंच विनायक गाडगीळ यांसह सुनिल सावंत विलास सावळ, उसपचे माजी सरपंच प्रकाश गवस, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, महादोळकर मायकल लोबो अभियंता धरणे, श्री. चव्हाण उपस्थित होते

