कोकणमहाराष्ट्रमालवणसिंधुदुर्ग

🛑परप्रांतीय नौकेवर सागरी हद्दीत अनधिकृत मासेमारीप्रकरणी कारवाई : नौका जप्त, मासळीचा लिलाव

*🛑परप्रांतीय नौकेवर सागरी हद्दीत अनधिकृत मासेमारीप्रकरणी कारवाई : नौका जप्त, मासळीचा लिलाव*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴मालवण, दि- २२:-* महाराष्ट्र सागरी मासेमारी (नियमन) अधिनियम, १९८१ व सुधारणा अधिनियम, २०२१ अंतर्गत परप्रांतीय नौकेवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई दि. २१ एप्रिल २०२५ रोजी रात्री ११.३९ वाजण्याच्या सुमारास मुणगेच्या समोर अंदाजे ९-१० सागरी मैलांवर, म्हणजेच अठराव्या वाव पाण्यात, करण्यात आली.

मत्स्यव्यवसाय विभागाच्या अंमलबजावणी अधिकारी तथा सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी, सिंधुदुर्ग, श्रीमती तेजस्विता भ. करंगुटकर या नियमित गस्त घालत असताना, कर्नाटक राज्याच्या जलधी क्षेत्रासाठी परवाना असलेली “श्रीम. वेदवती स. पुथरण, रा. मारीकंबा नगर थोत्तम, उडपी, राज्य – कर्नाटक” यांची “श्री महालक्ष्मी ३” (नोंदणी क्र. IND-KA-2-MM-6268) ही नौका महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात मुणगेसमोर अनधिकृतरीत्या मासेमारी करताना आढळून आली.

सदर नौकेवर एक तांडेल व सहा खलाशी असे एकूण सात सदस्य होते. नौका ताब्यात घेऊन ती सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आली आहे. यावर आढळलेली अंदाजे ३० ते ३५ हजार रुपये किंमतीची मासळी लिलावासाठी ठेवण्यात आली असून त्याची कार्यवाही सुरू आहे.

ही कारवाई मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी श्री. अमित हरमलकर, सागरी सुरक्षा पर्यवेक्षक मालवण/सर्जेकोट तसेच सागरी सुरक्षा रक्षक मालवण व देवगड यांच्या सहकार्याने व सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

अंमलबजावणी अधिकारी श्रीमती तेजस्विता भ. करंगुटकर यांनी सदर घटनेबाबत प्रतिवेदन दाखल केले असून, संबंधित नौकेविषयीची सुनावणी मा. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या न्यायालयात ठेवण्यात येणार आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!