🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यात बेरोजगारी तसेच आर्थिक नैराश्य यामुळे होणाऱ्या आत्महत्यांना नेमकं जबाबदार कोण.
*🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यात बेरोजगारी तसेच आर्थिक नैराश्य यामुळे होणाऱ्या आत्महत्यांना नेमकं जबाबदार कोण.*
*🛑गेल्या 30 वर्षांपासूनचे सत्ताधारी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वाढत्या जीडीपीवर भाष्य करणाऱे याबाबत गप्प का -मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- २१:-* सन 2024 या पूर्ण वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास४७९ जणांनी आपले जीवन संपविले. याची कारणे अनेक असली तरी या आत्महत्यांच्या कारणांमध्ये मोठा टक्का नोकरी नसल्यामुळे बेरोजगारी व उद्योगधंद्यांमध्ये कर्जबाजारी हा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेने गेल्या 30 वर्षाच्या राजकारणात अनेक जणांना मोठ्या अपेक्षेने संधी देऊन पाहिल्यात. परंतु आज तगायत कोणीही इथल्या बेरोजगारीचा प्रश्न सोडवू शकलेले नाही. किंवा शाश्वत असे उद्योगधंदेही आणू शकले नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जीडीपीचा टक्का नेहमी वाढतच असल्याचे केंद्रीय माजी सूक्ष्म व लघुउद्योग व राज्याचे महसूल तथा उद्योग मंत्री राहिलेले नारायण राणे नेहमी सांगतात मग असे असताना सुद्धा जिल्ह्यात ही परिस्थिती का.सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आणि उद्योग मंत्री ज्याप्रकारे तिन पैकी दोन आमदार यांच्या पक्षाचे असतानाही पक्षवाढीसाठी वारंवार बैठक घेताना दिसत आहेत. तसे उद्योग मंत्री म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्योग धंदे आणण्याकरिता एकही बैठक घेताना दिसत नाहीत ही मोठी खंत आहे.
पालकमंत्री नितेश राणे यांनी आजच सिंधुदुर्ग चिपी विमानतळ सुशोभीकरण करण्यासाठी जिल्हा नियोजन मधून निधी देण्याची घोषणा केली मुळात जिल्ह्यातील विमानतळ नेमकं न चालण्याचे कारण काय हे शोधण्याची गरज आहे. नुसता निधी खर्चून सुशोभीकरण करून चिपी विमानतळ चालणार नाही. तर जिल्ह्यात मोठ मोठे उद्योगधंदे आणल्यास व पर्यटन स्थळांचा शाश्वत विकास केल्यास विमानतळ चालणे शक्य होईल.
त्यामुळे जिल्ह्यात होणाऱ्या बेरोजगारी, उद्योगधंद्यांमध्ये कर्जबाजारी यामुळे आर्थिक नैराश्येतुन होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र म्हणून प्रतिनिधित्व करत असताना प्रामाणिक उपाययोजना करण्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

