🛑माजगांव सरपंचांवर अविश्वास ठरावाचा अर्ज
*🛑माजगांव सरपंचांवर अविश्वास ठरावाचा अर्ज*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- २१:-* माजगाव (सावंतवाडी) सरपंच अर्चना सावंत यांच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामपंचायतीतील सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी अविश्वास ठरावाचा अर्ज तहसीलदार कार्यालयात निवडणूक नायब तहसीलदार श्रीमती तारी यांच्याकडे दिला आहे. उपसरपंच रिचर्ड डिमेलो, सदस्य संतोष वेजरे, संजय कानसे, ज्ञानेश्वर सावंत, अशोक चुरी, मधु कुंभार, उर्मिला मोरये, गीता कासार, विशाखा जाधव, पूजा गावडे, माधवी भोगण, प्रज्ञा भोगण आदी १२ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल करण्यासंदर्भात निवेदन दिले आहे.
ग्रामपंचायतीच्या मासिक सभा, ग्रामसभा याबाबतच्या ठरावांची पूर्तता न करणे, ग्रामपंचायत तक्रार अर्जावर कुठलेही निर्णय न घेणे, ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता स्वतःच्या मर्जीने कारभार हाकणे, विकासकामांच्या निविदा प्रक्रियेत हस्तक्षेप करून अधिकारांचा गैरवापर करणे अशा मुद्यावर अविश्वास ठराव दाखल करत असल्याचे म्हटले आहे.
माजगाव ग्रा. पं.वर दोन वर्षांपूर्वीच भाजपची एकहाती सत्ता आली होती. सरपंच भाजपचे असून १२ सदस्यांपैकी जवळपास निम्मे सदस्य भाजपचे आहेत, सत्ताधारी भाजपच्या सरपंचांविरोधात त्यांच्याच पक्षातील सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल करण्यासंदर्भात अर्ज दिला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

