शिव जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या सांस्कृतिक सेलच्या वतीने शिवगान स्पर्धेचे आयोजन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत
🎴सावंतवाडी,दि.03: महाराष्ट्र प्रदेश भाजप सांस्कृतिक सेलच्या वतीने शिवजयंतीनिमित्त शिवगान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेची प्राथमिक फेरी जिल्हास्तरावर आणि अंतिम फेरी राज्यस्तरावर होणार आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी मंगळवार दिनांक 9 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी साडेनऊ वाजता बॅरिस्टर नाथ पै महाविद्यालय एमआयडीसी कुडाळ येथे संपन्न होणार आहे. या स्पर्धेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील पोवाडा, पाळणा, शिवस्फूर्ती गीत, आरती, ललकारी, अभंग आदी प्रकारच्या गीतांचा समावेश आहे. ही स्पर्धा खुली असून 12 वर्षावरील कोणीही व्यक्ती सहभागी होता येईल. स्पर्धकाला मराठी हिंदी व संस्कृत भाषेतील गीत सादर करता येईल. वैयक्तिक गीत सादर करण्यासाठी तीन ते पाच मिनिटांचा वेळ तर सांघिक गीत सादर करण्यासाठी पाच ते सात मिनिटे वेळ देण्यात येईल. स्पर्धकाने स्वतःचे वाद्य आणि वादक कलाकार सोबत आणावे. जिल्हास्तरावरील प्राथमिक फेरीसाठी वैयक्तिक प्रकारात पारितोषके अनुक्रमे रुपये 5000, रुपये 3000, रुपये 2000, तसेच सांघिक प्रकारात अनुक्रमे रुपये 7000, रुपये 5000, रुपये 3000 असे देण्यात येतील. वैयक्तिक तसेच सांघिक प्रकारात प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी अजिंक्यतारा सातारा येथे पाठवण्यात येईल, स्पर्धा कालावधीत कोरोनासंबंधीत सर्व शासकीय नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. स्पर्धेच्या नाव नोंदणीसाठी स्पर्धा प्रमुख प्रतिभा चव्हाण मोबाईल क्रमांक 8552013599 या क्रमांकावर संपर्क साधावा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व कलाकारांनी आणि शिवप्रेमी जनतेने या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा संस्कृतीक सेलचे जिल्हा संयोजक श्री बाळ पुराणिक यांनी केले आहे.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

