कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑विद्यार्थ्यांनी एसटीच्या बसेस रोखल्या

*🛑विद्यार्थ्यांनी एसटीच्या बसेस रोखल्या*

 

*🛑कणकवली-कुंभवडे बस वेळेत न सुटल्याने बसस्थानकात विद्यार्थी व पालक आक्रमक*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- १२:-* एसटीच्या कणकवली बसस्थानकातून सुटणारी कणकवली-कुंभवडे बस शनिवारी न सोडल्याने कुंभवडे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्थानकातून सुटणाऱ्या बसेस रोखून ठरल्या. एसटी प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर विद्यार्थी व पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बस रोखून धरल्यामुळे अन्य मार्गावर जाणाऱ्या बसेसचे वेळापत्रक विस्कळीत झाले. अखेर कणकवली आगाराचे व्यवस्थापक अजय गायकवाड यांनी विद्यार्थ्यांसाठी कुंभवडेकडे जाणारी बस उपलब्ध दिल्यानंतर रोखलेल्या बस मार्गस्थ होण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाट मोळकी करून दिली. या प्रकारामुळे कणकवली बसस्थानक काही काळ वातावरण तंग झाले होते.

कणकवली आगारातून कणकवली-कुंभवडे ही बस नियमित सोडली जाते. या बसमधून कुंभवडे विद्यालयातील शिकणारे विद्यार्थी ये-जा करीत असतात. कुंभवडे विद्यालयाचे विद्यार्थी शनिवारी सकाळी ५ वाजल्यापासून कुंभवडे-कणकवली बस पडकण्यासाठी स्थानकात आले होते. विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालक व शिक्षक उपस्थित होते. सदर बस बसस्थानकातून नियमित सकाळी ६ वाजता सुटते. मात्र, शनिवारी ही बस सोडण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी बसेस रोखून ठरल्या. त्यामुळे अन्य मार्गांवर जाणाऱ्या बसेस वेळेत न सुटल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. या प्रकाराची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. अखेर विद्यार्थ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर एसटीच्या अधिकाऱ्यांनी कुंभवडेकडे जाण्यासाठी तात्काळ बस उपलब्ध करून दिली. त्यानंतर रोखलेल्या बसेस मार्गस्थ होण्यासासाठी विद्यार्थ्यांनी वाट मोळकी करून दिली. एसटी नियमित सुटणाऱ्या गाडयांचे नियोजन शुक्रवारी काही कारणांस्तव करता आले नव्हते. त्यामुळे कुंभवडे-कणकवली ही बस वेळेत सुटली नाही. यापुढील काळात सदर बस वेळेत सोडण्यात येईल, असे आश्वासन गायकवाड यांनी दिले.

गेले काही दिवस दर शनिवारी आगारातून सकाळी ६ वाजता सुटणारी कुंभवडे-कणकवली बस वेळेत सुटत नाही. परिणामी विद्यार्थ्यांचा बस अभावी खोळंबा होत आहे. बस नियमित सोडण्याबाबत एसटी प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र, त्या सुधारणा झाली नाही. त्यामुळे बस रोखण्याचा विद्यार्थ्यांना पवित्रा घ्यावा लागला. बस वेळेत सुटली नसल्याने आमचा पेपर देण्यासाठी वेळेत पोहोचत न आल्याने चुकाला आहे. याला एसटीचा भोंगळ कारभार कारणीभूत आहे, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, पोलीस विनोद सुपल यांच्यासह पालक उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!