बीफ, ड्रग्स विकणारे जिल्ह्यात वाढलेत..आम्हीच इन्फॉर्मशन द्यायची तर आम्हाला युनिफॉर्म द्या ; आमदार निलेश राणे
बीफ, ड्रग्स विकणारे जिल्ह्यात वाढलेत..आम्हीच इन्फॉर्मशन द्यायची तर आम्हाला युनिफॉर्म द्या ; आमदार निलेश राणे
जिल्हा नियोजन बैठकीत पोलीस प्रशासनाला धरलं धारेवर
जिल्ह्यात ड्रग्स संदर्भातील माहिती आम्हीच द्यायची तर आम्हाला युनिफॉर्म द्या असा सवाल आमदार निलेश राणे उपस्थित करत पोलीस प्रशासनाला धारेवर धरले. जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांना चांगलेच फैलावर घेतले. हे ड्रग्स विकणारे, बीफ विकणारे जिल्ह्यात पॅरलल इकॉनॉमी चालवत आहेत, यावर तुमचं, डिपार्टमेंटच काय लक्ष आहे निवतीला दोन वर्षापूर्वीच्या एका मर्डर केससाठी SP दोन दिवस निवती पोलीस स्टेशनला बसून होते, ही तत्परता का?? तसेच कुडाळ मधून गेलेला २५ किलो गांजा गोव्यात पकडला गेला त्यावेळी का कारवाई झाली नाही?? जिल्ह्यात एवढं बीफ पकडलं गेलं किती धाडी घातल्या गेल्या अशा प्रश्नाची सरबत्ती आमदार निलेश राणे यांनी केली यावर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी उत्तर देताना म्हटले की आम्हाला तुम्ही असं काही समजलं तर तात्काळ आम्हाला इन्फरमेशन द्या असे सांगितले यावर निलेश राणे संतप्त होत म्हणाले आम्हाला माहिती द्यायची असेल तर आम्हाला युनिफॉर्म द्या असे सांगितले…

