🛑ईन्सुली रमाईनगर येथे महात्मा फुलेंना जयंतीनिमित्त अभिवादन !
*🛑ईन्सुली रमाईनगर येथे महात्मा फुलेंना जयंतीनिमित्त अभिवादन !*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴इन्सुली, दि- ११:-* भीमगर्जना युवक मंडळ,ईन्सुली रमाइनगर यांच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले याची 198 वी जयंती डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिर इन्सुली,रमईनगर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात प.पू.डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्यास मंडळाचे अध्यक्ष परेश जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन व दीप प्रज्वलाने झाली.तसेच महात्मा फुले व माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना अनुजा जाधव व सविता जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कुमारी सपना हिने महात्मा फुलेंच्या कार्याचा आढावा घेतला.त्यामध्ये फुलेंनी शेतकरी बांधवासाठी केलेली कामे आजच्या काळातही उपयोगी असल्याचे सांगितले व आजच्या राजकर्त्यानी फुलेंचा आदर्श समोर ठेवून कामे केली तर शेतकरी आत्महत्या ऱोखल्या जावु शकतात असे प्रांजळपणे व्यक्त केले.सिध्देस यांनी आपले विचार मांडताना महात्मा फुलेंचे नेतृत्व प्रामाणिक असुन बोलण्याप्रमाणे त्यांची कृती होती म्हणूनच कार्यकर्त्यांवर त्यांचा प्रभाव होता; परंतु सध्याचे नेतृत्व समाजाची दिशाभूल करणारे असून फूलेंच्या विचारांचा अभाव त्यांच्यामध्ये असल्याचे सांगितले.
परेश जाधव यांनी समारोपीय मनोगतामध्ये फुलेंच्या जीवनातील काही प्रसंग सांगताना महिलांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा करण्यासाठी सावित्रीबाईंना शिकवताना व महिला शाळा चालवताना फुले दांपत्यांना झालेल्या अनेक आव्हानांचा उल्लेख केला.तसेच महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढुन सर्वात प्रथम शिवजयंती साजरी केल्याचे सांगितले.यावेळी उपस्थितांचे आभार मानून समाजमंदिर सारख्या पवित्र ठीकाणी अशा प्रकारचे महापुरुषांचे जयंती कार्यक्रम करुन त्यांच्या विचारांचा जागर करण्याचा समाजमंदिरचा उद्देश तुम्ही सार्थ करता असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी आनंद जाधव यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा देत नविन कार्यकारिणीचे अभिनंदन केले.या कार्यक्रमात सचिव अरविंद जाधव, जेष्ठ सल्लागार लाडू जाधव, दिपेश जाधव,तेजस जाधव,मिथिल जाधव,संजना जाधव,वृषाली जाधव,स्मिता जाधव,दिपाली जाधव,स्म्रितिषा जाधव,सानिका जाधव,सृष्टी जाधव, कृतिका जाधव,गिताली जाधव, लैला जाधव ईत्यादी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार परेश जाधव यांनी केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

