सावंतवाडी तालुक्यातील प्रशालेतील विद्यार्थ्यांना सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान तर्फे शालेय साहित्य वाटप..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि.०३: सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान अनेक सामाजिक कार्यात अग्रेसीत असते. विविध विषयांबाबत जनजागरण, वैद्यकीय, प्रशिक्षण यासह शैक्षणिक कार्य प्रतिष्ठान द्वारे केल्या जातात. प्रतिष्ठानचे शैक्षणिक कार्य महत्वाचे आहे, ज्यात ‘शब्दगंध’ शालेय वाचनालय, गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, विद्यार्थ्यांना छत्री, सायकल तसेच इतर आवश्यक साहित्याचे वाटप करणे सामील आहे. कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे यावर्षी शाळा उशिरा सुरू झाल्या. कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक कोंडीने अनेक पालक त्रस्त झाले. त्यांना थोडा हातभार म्हणून प्रतिष्ठानतर्फे त्यांच्या पाल्यांना एकूण ७० “स्कुल किट” देण्यात आल्यात. यात १ स्कुल बॅग, १ एक्झाम पॅड, १ टिफिन डबा, ३ लॉंग बुक्स, कंपास पेटी, फाईल फोल्डर, पेन्स ई. साहित्य देण्यात आले.
यात कै. बाबुराव पाटयेकर माध्यमिक विद्यालय, दाणोली; श्री शिवाजी विद्यालय, विलवडे; श्री रवळनाथ विद्यामंदिर, ओटवणे; श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय, माजगाव; मळगाव इंग्लिश स्कुल, मळगाव; सेंट्रल उर्दू हायस्कूल, सावंतवाडी; वि. स. खांडेकर माध्यमिक शाळा, सावंतवाडी; पू. आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय, कारीवडे या सावंतवाडी तालुक्यातील प्रशालामधील विद्यार्थ्यांना हे साहित्य देण्यात आले.
यावेळी विशेष म्हणजे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचे पाल्य नेहमी प्रतिष्ठानच्या उपक्रमात हिरीरीने सक्रिय असतात. वाढदिवशी ते प्रतिष्ठानला त्यांच्या लहानशा जमा रकमेतून प्रतिष्ठानला आर्थिक मदत करीत असतात. त्यांचा सेवाभाव टिकावा व प्रतिष्ठानविषयी त्यांच्या मनातील स्नेह वृद्धिंगत व्हावा. तसेच त्यांनाही शाबासकीची थाप म्हणून यावेळी सिंधुमित्रांचा बाल चमुला देखील स्कुल किट देण्यात आली.
विशेष म्हणजे दयासगर छत्रालय, रोणापाल येथील निवासी विद्यार्थ्यांना “स्कुलकिट” देण्यात आले. याशिवाय या वसतिगृहास टूथपेस्ट, टूथब्रश, ओडोमॉस क्रीम हे साहित्य देखील देण्यात आले.
प्रतिष्ठानने घेतलेल्या या उपक्रमाचे प्रशालेतील शिक्षक तसेच वसतिगृहाचे प्रमुख श्री. जीवबा वीर यांनी कौतुक व आभार व्यक्त केले.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे ऍड. शामराव सावंत, प्रा.सौ. रमा सावंत, डॉ.सौ. मुग्धा ठाकरे, दिपक गावकर, अँड्र्यू फर्नांडिस, सीए लक्ष्मण नाईक, डॉ. शंकर सावंत, भार्गवराम शिरोडकर, आनंद मेस्त्री, आसिफ शेख, भगवान रेडकर, प्रशांत कवठणकर, सौ. अनघा शिरोडकर, सौ. अँटोनेट फर्नांडिस व सिद्देश मणेरीकर यांनी परिश्रम घेतले.
*_💥सावंतवाडी शहरात तुकाराम परब यांचे दर्जेदार चिकन सेंटर.._💥*
*🔥ग्रंथा चिकन सेंटर🔥*
_🌈आमच्या येथे बॉयलर व गावठी कोंबडी विकत मिळतील.._
*🤷🏻♂️आमचा पत्ता ⬇️*
प्रोप्रायटर – तुकाराम परब
पाटणकर-चौगुले तिठा, बिरोडकर टेंब, बाबा बिरोडकर मार्ग, न्यू सबनीस वाडा, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*💁🏻♂️मोबाईल नंबर ⬇️*
*_📱९४२०२६१५८४_*
*_📱९४०३७०१५८५_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_