शिल्पग्राम परिसरात नगरपालिकेने सिसिटीव्ही कॅमेरे बसवावेत : आशिष सुभेदार
शिल्पग्राम परिसरात नगरपालिकेने सिसिटीव्ही कॅमेरे बसवावेत : आशिष सुभेदार
खासकीलवाडा शिल्पग्राम परिसरात वारंवार कचरा टाकण्यात येत असल्यामुळे तिथे आग लागण्याचे प्रकार होत आहेत त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरून रोगराई होण्याची शक्यता आहे परिणामी या तिठावर नगरपालिकेने सिसिटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी ठाकरे शिवसेनेचे युवा कार्यकर्ते आशिष सुभेदार यांनी केली आहे.
मागील अनेक दिवस खासकीलवाड्या बाहेरील नागरिक येऊन या तिठावर ओला सुका कचरा तसेच इतर कचरा आणून त्या परिसरात टाकत आहेत. यात स्थानिक कोणीही नसून या परिसरात कचऱ्यामुळे दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे. बऱ्याच वेळा तिथे आग लागण्याचे प्रकार घडत आहेत. या भागात सतत कचरा घंटा गाडी जात आहे शिवाय सफाई कर्मचारी ही राबतात तरी ही अशी घाण केली जाते त्यावर आळा बसला पाहिजे. त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास जे कोणी कचरा टाकत आहेत त्यांच्यावर कारवाई करणे सोपे होईल व पुन्हा अशी कोणी हिंमत करणार नाही जेणेकरून परिसर दुर्गंध करणाऱ्या व्यक्तींना योग्य वेळेस धडा मिळेल त्याचप्रमाणे काही कालावधी साठी आपला कर्मचारी देखील त्या वेळेत उभे करावेत जेणेकरून असा कचरा टाकून वारंवार दुर्गंध करणाऱ्या नागरिकांना योग्य वेळेस चाप लागेल. नगर परिषदेचे अधिकारी आपले काम बऱ्याच वेळा योग्यरीत्या करीत आहेत पण काही बाहेरील नागरिक नगर परिषदेचे कर्मचारी त्या ठिकाणी नसताना असा कचरा फेकून दुर्गंधी करत आहेत तर त्यांना योग्य वेळी समज मिळालीच पाहिजे अन्यथा ज्यावेळी आम्हाला आढळेल त्यावेळी आम्ही योग्य धडा देऊ असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आशिष सुभेदार यांनी दिला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास सदर भाग दुर्गंधी मुक्त होईल व बाहेरील जे कोणी नागरिक करत असतील त्यांना पकडणे सोपे होईल त्यामुळे याची त्वरित अंमलबजावणी करावी असे निवेदनात सुभेदार यांनी म्हटले आहे.