कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑“धरणाच्या सावलीत धुळीचा कहर”डॉ जयेंद्र परुळेकर.

*🛑“धरणाच्या सावलीत धुळीचा कहर”डॉ जयेंद्र परुळेकर.*

 

*🛑वाफोली-विलवडेतील बेकायदा दगडखाणींविरोधात महिलांचा एल्गार.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १८:-* सावंतवाडी तालुक्यातील वाफोली-विलवडे परिसरात सुरू असलेल्या बेकायदा दगडखाणी (क्वारीज्) आणि क्रशर्सविरोधात ग्रामस्थांनी अखेर संतापाचा स्फोट केला आहे. विशेष म्हणजे या आंदोलनात महिलांचा पुढाकार ठळकपणे दिसून आला.

लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या बॅकवॉटरच्या अगदी लगतच सुरू असलेल्या या उद्योगांमुळे पर्यावरण, आरोग्य आणि ग्रामस्थांचे जगणेच धोक्यात आले आहे असे डॉ जयेंद्र परुळेकर यांनी म्हटले आहे

ग्रामस्थांच्या मते, या दगडखाणींमध्ये केवळ दिवसा नव्हे, तर मध्यरात्रीसुद्धा स्फोटकांच्या साहाय्याने ब्लास्टिंग केले जाते. रात्रीच्या शांततेत होणारे हे स्फोट गावकऱ्यांच्या झोपेचे अक्षरशः चुराडे करत आहेत. याशिवाय पाच ते सहा क्रशर्समधून निर्माण होणारी प्रचंड धुळ संपूर्ण परिसर व्यापून टाकत आहे. परिणामी लहान मुले, वृद्ध आणि महिलांमध्ये दमा, रक्तदाब यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

या सर्व प्रकरणातील सर्वात धक्कादायक मुद्दा म्हणजे — अनेक क्रशर्स आणि क्वारीज् या विनापरवाना सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. जर हे खरे असेल, तर प्रशासनाच्या नाकावर टिच्चून हा प्रकार सुरू कसा राहिला? हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे असे सामाजिक कार्यकर्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

दरम्यान, वाढता जनक्षोभ लक्षात घेता तहसीलदारांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधित दगडखाणी व क्रशर्स तात्पुरते बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र ग्रामस्थांच्या मते, “तात्पुरते” नव्हे तर “कायमस्वरूपी” बंदी हाच एकमेव पर्याय आहे.

याच परिसरालगत असलेले भालावल हे इको-सेन्सिटिव्ह गाव आहे. अशा संवेदनशील भागात स्फोटकांवर आधारित उद्योग सुरू राहणे म्हणजे पर्यावरणाशी सरळ खेळ असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. वन्यजीवांचे अधिवास उद्ध्वस्त होत असून गवे, सांबर यांसारखे प्राणी गावांकडे आणि शेती भागात स्थलांतरित होत असल्याच्या घटना वाढल्या आहेत.यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे — लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या इतक्या जवळ हे सर्व सुरू असताना पाटबंधारे विभाग नेमका काय करत होता? परवानग्या कोणाच्या आशीर्वादाने मिळाल्या? या सर्वांचा सखोल तपास होणे अत्यावश्यक आहे.

*धुळ, ध्वनी आणि धोका — ग्रामस्थांचा जगण्याचा हक्क हिरावला जातोय!”*

सध्या प्रशासनाने घेतलेली तात्पुरती कारवाई ही केवळ ‘आग विझवण्याचा’ प्रयत्न असल्याची टीका होत आहे. मात्र या प्रकरणात कायमस्वरूपी तोडगा न निघाल्यास आंदोलन आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

आता प्रश्न एकच — जनतेच्या आरोग्याशी आणि पर्यावरणाशी खेळणाऱ्या या बेकायदा दगडखाणींवर कायमची गंडांतर कधी बसणार?

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!