कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑अवैध धंदे पोसण्याचा विडा उचलला आहे का?

*🛑अवैध धंदे पोसण्याचा विडा उचलला आहे का?*

 

*🛑माजी आमदार परशुराम उपरकर यांचा पालकमंत्र्यांना सवाल*

 

*🛑ड्रग्स तस्करी पालकमंत्री, पोलीस यंत्रणेची नामुष्की*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- ०२:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. हे धंदे बंद करण्यात पालकमंत्री नितेश राणे व पोलीस यंत्रणेला अपयश आलेले आहे. जिल्ह्यात गोव्याला अमलीपदार्थांचा पुरवठा करणारे रॅकेट सक्रिय आहे. या रॅकेटला मंत्री श्री. राणे व पोलीस यंत्रणेचा धाक राहिलेला नाही. जिल्ह्यातून ड्रग्सची तस्करी होते ही पालकमंत्री व पोलीस प्रशासनाची नामुष्की आहे. अवैध धंदे हे पालकमंत्र्यांच्या आशीवार्दाने सुरू आहेत का? त्यांनीच अवैध धंदे पोसण्याचा विडा उचलला आहे का? असे सवाल शिवसेना उबाठा पक्षाचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले. दमदार मंत्री म्हणून स्वतःची प्रतिमा तयार करणारे मंत्री राणे यांची आता अपयशीमंत्री म्हणून वाटचाल सुरू झाली आहे, अशी टीका उपरकर यांनी केली.

येथील संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. उपरकर बोलत होते. उपरकर म्हणाले, हिंदूंचे गब्बर म्हणून मिरवणारे मंत्री राणे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी जनतेला शासनाने आनंदाचा शिधा वाटप करावा, अशी मागणी करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी ही मागणी करणे टाळले. याशिवाय ईदनिमित्त मोदी सरकारने मुस्लिमांना सौगाद-ए-मोदी कीट वाटप केले. नेहमीच मुस्लिमांच्याविरोधात कडवट भूमिका घेणाऱ्या मंत्री राणे यांनी सौगाद-ए-मोदी कीट वाटपालाविरोध का केला नाही? असा सवाल उपरकर यांनी केला. मंत्री राणे यांनी आैरंगजेबाच्या कबर हटविण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात मुस्लिम नव्हते, असे विधान केले होते. आरएसएसने त्यांना समजुतीचे डोस पाजल्यामुळे मंत्री राणे यांनी आपल्या भूमिकेबद्दल घुमजाव केला आहे. आैरंगजेबची कबर व स्वराज्यात मुस्लिम नव्हते यावरून जनतेचे लक्ष हटविण्यासाठी त्यांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा विषय पुन्हा उखरून काढला आहे, असा अारोप उपरकर यांनी केला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रामध्ये परराज्यांतील एलईडीद्वारे पर्ससीन मासेमारी करणाऱ्यांवर नौकांवर मत्स्य विभागाकडून कारवाई केली जाते. मात्र, रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एलईडीद्वारे पर्ससीन मासेमारी करणाऱ्यांवर मत्स्य विभागाकडून कारवाई केली जात नाही. त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांनी मत्स्य विभागाच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करीत त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. मंत्रिमंडळामध्ये मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास खात्याच्या मंत्र्यांचा 15 नंबर लागतो. त्यामुळे मंत्री राणे यांनी आपली कुवत, आवाका आणि उंचीप्रमाणे जनतेला शब्द द्यावेत, असा टोला उपरकर यांनी लगावला. मागील सहा महिन्यांपासून पालकमंत्र्यांचे अपयश जनतेला दिसू लागले असून त्यांची वाटचाल अपयशी पालकमंत्री म्हणून सुरू झाली आहे, अशी कोपरखळी उपरकर यांनी मारली.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!