हरकुळ बु. येथे उद्या विविध कार्यक्रम
हरकुळ बु. येथे उद्या विविध कार्यक्रम
कणकवली ः हरकुळ बुद्रुक-टेंबवाडी येथील ओमकार मित्रमंडळ यांच्यावतीने टेंबवाडीतील डाॅ. मराठे दवाखान्यानजीक मंगळवार 1 एप्रिल रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी 3 वा. हरिपाठ, सायंकाळी 5 वा. स्थानिक भजनी कलाकारांची भजने, रात्री 10 वा. नितीन आशयेकर प्रस्तुत श्री देवी भूमिका दशावतार नाट्यमंडळाचा प्रयोग सादर होईल. या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाने केले आहे.