राजकीयशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

बांद्यात पणजी ते शिर्डी बसचे जल्लोशी स्वागत..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : बांदा

🎴बांदा,दि.०२: पणजी ते शिर्डी नविन सुरू झालेल्या शिवशाही एसटी बसचे साईभक्ताकडुन बांद्यात जल्लाेशी स्वागत करण्यात आले. काेराेना महामारी संकटाने त्रस्त झालेला आपला देश पुर्वपदावर येत असताना महाराष्ट्र राज्य परीवहन मंडळाने साईभक्तांंच्या सेवेसाठी नविनच पणजी ते शिर्डी शिवशाही बससेवा १ फेब्रुवारी पासुन सुरू केली आहे. या साई सेवेचे स्वागत बांदा येथिल श्री साईबाबा भक्त सेवा मंडळातील विश्वस्त व  साईभक्तांनी केले. मंडळाचे  सल्लागार श्री. सुशांत पांगम यांनी श्रीफळ वाढवुन वाहनाला पुप्षहार अर्पण केला. यावेळी बांदा ग्रामपंचायत सदस्य  साईप्रसाद काणेकर व राजेश विर्नाेडकर यांनी वाहन चालक राजन मांजरेकर, वाहक सुनिल शिंदे यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. अनेक दिवसापासुन बांदा शहरातील  साईभक्ताची असलेली मागणी महाराष्ट्र राज्य परीवहन  मंडळाने पुर्ण केली या बाबत  बांदा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी मंडळाचे विश्वस्त सुनील नाटेकर यांनी हि मागणी पुर्ण झाल्याने सावंतवाडी एसटी डेपाे मँनेजरचे व अमित गाेवेकर यांचे आभार मानले. हि बस सकाऴी १२ वा. पणजी वरुन सटुन बांदा एसटी स्टँडवर  दु. २.०० वा. येईल बाबांच्या पावन भुमीत शिर्डी मध्ये पहाटे सकाळी ७.०० वा. पाेहचणार आहे. अशी माहीती चालक राजन मांजरेकर यांनी दिली. यावेळी विश्वस्त निखिल मयेकर, आदित्य शिराेडकर,  हेमंत दाभाेलकर, अमित गाेवेकर, मंडळाचे अध्यक्ष राकेश केसरकर, ज्ञानेश्वर येडवे, हनुमंत नाटेकर, व इतर साईभक्त उपस्थित हाेते.

*_💥पोल्ट्री साहित्याच्या शोधात आहात? चिंता सोडा..💥_*

🌈आमच्या दर्जेदार, टिकाऊ व माफक दरातील पोल्ट्री साहित्याचा अनुभव घ्या! आणि सोडा सुटकेचा निश्वास..😊

   _*🐓🔥 सिश्रायु पोल्ट्री सर्व्हिस 🔥🐓*_

_*💫आमच्याकडे पोल्ट्री साठी लागणारी जाळी, खाद्य भांडी, पाणी भांडी, ताडपत्री, भुसा ढवळण्याची मशीन इत्यादी साहित्य माफक दरात मिळेल..*_

*🤷🏻‍♂️ संपर्क ⬇️*
श्री. अमित देसाई,
निळेली (माणगाव)
तालुका. कुडाळ, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*🤷🏻‍♀️ मोबाईल नंबर ⬇️*
_*📱9403559599*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!