कचरामुक्त सिंधुदुर्ग किल्ला कार्यक्रमाचे ७ रोजी आयोजन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : वैभववाडी
🎴वैभववाडी,दि.०२: ‘माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट’ या संस्थेच्यावतीने रविवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी एक दिवशीय कचरामुक्त सिंधुदुर्ग किल्ला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. मालवण शहरामधील ऐतिहासिक ‘सिंधुदुर्ग किल्ल्या’ ची आज पडझड होत आहे. मालवण शहरातील बंदराच्या पश्चिमेस असलेला कुरटे बेटावरील छ. शिवाजी महाराजांनी या जलदुर्गाची उभारणी केली. त्याकाळी तब्बल एक कोटी होन खर्च झाले. ४८ एकर क्षेत्रातील हा जलदुर्ग अजूनही अभेद्य आहे. देशविदेशातून लाखो पर्यटक त्यास भेट देत असतात. शिवप्रेमी वारंवार त्याची स्वच्छता करीत असतात.परंतु किल्ल्यावर कचराकुंडी किंवा कचरा साठवण्याची व्यवस्था नसल्यामुळे प्लास्टिक बॉटल, पिशव्या सर्वत्र पसरलेल्या आहेत. किल्ल्यावरील प्लास्टिक कचरा आणि वाढलेले गवत काढण्याच्या उद्देशाने माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट संस्थेच्यावतीने रविवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२१ रोजी जिल्ह्यातील शिवप्रेमी सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग अॕडव्हेंचर व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने एक दिवशीय “कचरामुक्त सिंधुदुर्ग किल्ला” कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. जिल्ह्यातील शिवप्रेमी, इतिहास प्रेमी व स्थानिकांनी या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रकाश भाऊ नारकर, उपाध्यक्ष डॉ.कमलेश चव्हाण, सचिव प्रा.एस.एन. पाटील व शिवप्रेमी सिंधुदुर्गचे रमाकांत नाईक यांनी केले आहे.
_*🔥वर्षभराची जाहिरात केवळ १५ ते २० रुपयात..💥*_
💫डेट कॅलेंडर १५ रुपये (६ पानी आर्ट पेपर) (फर्मच्या नावे छपाई २०० पासून) साईज 10″×15″
💫पॉकेट डायरी २० रुपये (रेक्झीन कवर, छपाईसहित)
💫 विविध प्रकारच्या डेट डायऱ्या..
💫टेबल कॅलेंडर्स ५५ रुपये पासुन..
💫पॉलि कॅलेंडर्स १२ रुपये पासुन..
💫आधुनिक प्रकारचे नायलॉन, प्रिइंक शिक्के..
_*🌈खास एल.आय.सी. एजंट साठी उपयुक्त डेट कॅलेंडर व फाईल्स; शिवाय विविध प्रकारच्या भेटवस्तू 🤷🏻♂️*_
*💁🏻♂️ आमचा पत्ता ⬇️*
प्रसाद ऑफसेट, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*🙋🏻♂️मोबाईल नंबर ⬇️*
_*📱7057956111*_
_*📱9422065195*_
*💁🏻♀️ व्हाट्सअप नंबर ⬇️*
_*📲9822856111*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
