कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑चौकुळ जंगलात शिकाऱ्यांकडून वन अधिकारी यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न

*🛑चौकुळ जंगलात शिकाऱ्यांकडून वन अधिकारी यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न*

 

*🛑मुद्दे मालासह चार जण ताब्यात*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴आंबोली, दि- २६:-* चौकुळ-इसापुर जंगलात शिकारीसाठी फिरणाऱ्या चौघा शिकाऱ्यांनी वनविभागाच्या पथकाच्या दिशेने गोळीबार करीत जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हा थरार चौकुळ जंगलात घडला. त्या हल्ल्याला प्रतिकार करीत महिला वनअधिकारी प्रमिला शिंदे यांनी चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे शिकार केलेला मृत ससा, काडतुसे आणि बंदुका, तीन दुचाकी असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई काल रात्री चौकुळ येथील जंगलात करण्यात आली.

दशरथ बाबुराव राऊळ (रा. माडखोल), प्रशांत सदानंद कुबल (रा. कुडाळ), अमोल नामदेव गावडे (रा. खासकीलवाडी-चौकुळ), सखाराम चंद्रकांत राऊळ (रा. माडखोल) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर वनजीव संरक्षण अधिनियमानुसार कारवाई करुन त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असे वनअधिकारी शिंदे यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती अशी की, आंबोली जंगलात काही शिकारी फिरत असल्याची माहिती शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी गस्त घालण्यास सुरुवात केली. यावेळी मध्यरात्री इसापुर परिससरात हे चौघे संशयास्पदरीत्या दिसून आले. यावेळी त्याच्याकडे विचारणा केली असता त्यांनी हातात असलेली बंदूक घेवून गोळीबार करुन त्या ठिकाणावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडे आढळून आलेल्या वाहनाची तपासणी केली असता एक शिकार केलेला मृत ससा, पाच जीवंत काडतूसे, दोन बॅटऱ्या, दोन मोबाईल, एक हेडफोन आणि तीन दुचाकी आदी साहित्य आढळून आले आहे.

या प्रकरणी त्यांना ताब्यात घेण्यात आले असून शासकीय कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हि कारवाई मेहबूब अप्पासो नाईकवडे वनपाल देवसू, संकल्प दिलीप जाधव वनरक्षक मसुरे, संग्राम पाटील वनरक्षक तपासणीनाका, आदित्य लाड वन रक्षक वेर्ले, एकनाथ पारधी, मंगेश सावंत, प्रथमेश गावडे, राकेश अमृस्कर आदीच्या पथकांकडून करण्यात आली.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!