कामबंद आंदोलन केलेले कंत्राटी कामगार आज पासून झाले कामावर रुजू
*माहिती अधिकारी प्रमुख सुशील चौगुले व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांची यशस्वी मध्यस्थी*
*सावंतवाडी, दि. १२:-* गेले ४ दिवस सावंतवाडी नगरपालिकेचे कंत्राटी कामगार यांचे कामबंद आंदोलन सुरु होते. अखेर आज माहिती अधिकारी प्रमुख सुशील चौगुले व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांच्या यशस्वी मध्यस्थीने नगरपालिका कंत्राटी कामगारांच्या रोजी रोटीचा प्रश्न सुटला. प्रभारी मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी यशस्वी तोडगा काढून कंत्राटी कामगारांच्या मागण्या केल्या मान्य. कंत्राटी कामगार यांनी खालील मागण्या केल्या होत्या त्यामध्ये
1) किमान वेतन वाढ
2 PF मिळावा
3).EPF मिळावा
4) NEFT ने कंत्राटी कामगारांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हावे.
5) कंत्राटी कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने मूलभूत सोयी सुविधा त्यामध्ये मास, हँड ग्लोज, सेफ्टी जॅकेट, ड्रेस कोड, पावसाळी रेनकोट तसेच सुरक्षा साहित्य पुरवणे या सर्व मागण्या प्रोसिडिंग वर घेऊन येत्या सोमवार पर्यंतर या सर्व गोष्टींची पूर्तता केली जाणार आहे अशी ग्वाही प्रभारी मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी दिली.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव व माहिती अधिकारी महासंघ (महाराष्ट्र राज्य) सुशील चौगुले यांनी यशस्वी मध्यस्थी करून कंत्राटी कामगारांच्या रोजी रोजी चा प्रश्न सोडवला त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी चौगुले व रवी जाधव यांचे आभार मानले.
कंत्राटी कामगारांच्या मागण्या मान्य झाल्यामुळे ७० कंत्राटी कामगार आज दुपारपासून कामावर रुजू झाले.गेली चार दिवस शहरामध्ये स्वच्छता विषयक थांबलेली सर्व कामे बंद होती ती कामे उद्यापासून सुरळीत होणार आहेत असे रवी जाधव यांनी सांगितले. याप्रसंगी प्रभारी मुख्याधिकारी परितोष कंकाळ, स्वच्छता अधिकारी पांडुरंग नाटेकर,दीपक म्हापसेकर,धनंजय देसाई, कंत्राटी कामगार बाबू बरागडे सचिन कदम, राजू मयेकर, शोहेब शेख ,गणेश खोरागडे आदी उपस्थित होते.