विद्यामंदिरमध्ये मराठी भाषा गौरव दिन ..
कणकवली : विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक पी.जे. कांबळे, शिक्षिका पी. पी. सावंत, अच्युत वणवे, जनार्दन शेळके, विद्या शिरसाट आदी उपस्थित होते.
आरंभी ज्ञानपीठ विजेते वि. वा. शिरवाडकर तथा कुमुमाग्रज यांच्या प्रतिमेला शिक्षकांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. यावेळी पी. जे. कांबळे, पी. पी. सावंत, अच्युत वणवे, जनार्दन शेळके यांनी मराठी भाषेचे महत्त्व समजून सांगितले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

