वैभववाडीशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

‘किंजळी’च्या माळ पुनर्वसनातील अपुर्ण कामे येत्या आठ दिवसात पुर्ण न झाल्यास प्रकल्पग्रस्त प्रशासनाच्या विरोधात तिव्र आंदोलन करणार..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि.२८: किंजळी चा माळ पुनर्वसन गावठणात सोयी सुविधांचा अभाव असुन प्रकल्प अधिकारी राजन डवरी आणि पुनर्वसन विभागाने पुनर्वसनातील अपुर्ण कामे येत्या आठ दिवसात पुर्ण न केल्यास किंजळीचा माळ प्रकल्पग्रस्त प्रशासनाच्या विरोधात तिव्र आंदोलन छेडणार असल्याचा निर्धार किंजळी चा माळ गावठणात २६ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीला लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे,मुबई अध्यक्ष प्रकाश सावंत,संघटनेचे सेक्रेटरी अजय नागप,खजिनदार विलास कदम, ऊपाध्यक्ष संतोष चव्हाण व वासुदेव नागप,महिला अध्यक्ष सुचिता चव्हाण, सचिव आरती कांबळे, आदि उपस्थित होते.

किजळी चा माळ पुनर्वसन गावठणातील प्रकल्पग्स्तांना मांगवली पुनर्वसन गावठणात जोडुन नव्याने निर्माण होणार्‍या ग्रामपंचायती मध्ये किंजळीचा माळ गावठणातील प्रकल्पग्रस्तांचा समावेश झालाच पाहिजे. पुनर्वसना मध्ये नित्क्रुष्ट दर्जाची टाकण्यात आलेली पाईप लाईन, सातत्याने नळ लाईन लिकेज होत आहेत. अनेक ठिकाणी सरंक्षण भिंत आणि पिचींग ची कामे अपुर्ण आहेत. पुनर्वसनातील रस्ते नादुरुस्त आहेत. पुनर्वसन कायद्या प्रमाणे देय असलेली बोरींग आणि खुल्या विहीरी अद्याप पर्यन्त उपलब्ध करुन दिलेल्या नाहीत. किजळीचा माळ पुनर्वसन गावठण तिन टप्यात वसविण्यात आलेले आहे.एका टप्प्यात पाणी आले तर दोन टप्प्यात पाणीच येत नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्त हैराण आहेत.

ज्या प्रकल्पग्रस्तांना अद्याप भुखंड देण्यात आलेले नाही त्यांना घरे बादण्यासाठी तात्काळ भुखंड वाटप करा. मुळ गावात ज्यांची दुकाने आणि एन ए केलेले प्लाॅट मालक व दुकान मालक यांना अद्याप ही भुखंड वाटप केलेले नाहीत. आदी प्रश्नांचा भडीमार या बैठकीत विलास कोलते,सुरेश आप्पा नागप, ज्ञानेश्वर नागप, प्रसन्न नागप,परशुराम पडिलकर, प्रसन्न नागपूर आदिं नी केला.

हे सर्व प्रश्न सोडवण्या ऐवजी प्रकल्प अधिकारी राजन डवरी व पुनर्वसन विभाग चालढकल करीत आहेत. असा आरोप किंजळीचा माळ प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.
किंजळीचा माळ पनर्वसन गावठण मांगवली महसुल गावांना जोडण्यात यावे, या गावठणाचा मांगवली येथे होणार्‍या नव्या ग्रामपंचायतीत समावेश करण्यात यावा.तसेच प्रकल्पग्रस्त शांताराम नागप यांच्या आत्महत्येस जबाबदार धरुन कार्यकारी अभियंता राजन डवरी संबंधीत अधिकारी व गावाच्या वतीने घळभरणीस परवानगी देणार्‍या गावातील दलांलावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा आदी निर्णय किंजळीचा माळ पुनर्वसन गावठणात आयोजित केलेल्या बैठकीत घेण्यात आले आहेत.

या बैठकीला मोहण नागपूर, महादेव नागप, मधुकर नागप, वसंत नागप, भिवाजी पडिलकर, संतोष नागप,दिपक पडिलकर, दत्ताराम कदम, गोपाळ सुतार, मनोहर गुरव, मनिषा घाग, पार्वती पडीलकर, रत्नागिरी घाग आदी उपस्थित होते.

*_💥पोल्ट्री साहित्याच्या शोधात आहात? चिंता सोडा..💥_*

🌈आमच्या दर्जेदार, टिकाऊ व माफक दरातील पोल्ट्री साहित्याचा अनुभव घ्या! आणि सोडा सुटकेचा निश्वास..😊

   _*🐓🔥 सिश्रायु पोल्ट्री सर्व्हिस 🔥🐓*_

_*💫आमच्याकडे पोल्ट्री साठी लागणारी जाळी, खाद्य भांडी, पाणी भांडी, ताडपत्री, भुसा ढवळण्याची मशीन इत्यादी साहित्य माफक दरात मिळेल..*_

*🤷🏻‍♂️ संपर्क ⬇️*
श्री. अमित देसाई,
निळेली (माणगाव)
तालुका. कुडाळ, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*🤷🏻‍♀️ मोबाईल नंबर ⬇️*
_*📱9403559599*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!