🛑 कारिवडे गोसावीवाडी येथील सिद्धयोगी महापुरुष मठाच्या भंडारा उत्सवाची उत्साहात सांगता
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-१४:- कारिवडे गोसावीवाडी येथील सिद्धयोगी महापुरुष मठाच्या भंडारा उत्सवाला मंगळवारी रात्री हजारो भाविकांनी गर्दी केली होती. कारिवडेचे ग्रामदैवत काळकाई तरंग काठीसह सवाद्य पालखी मिरवणुकीने उत्सवस्थळी दाखल झाल्यानंतर बहीण भावाचे नाते असलेल्या सिद्धयोगी महापुरुष आणि ग्रामदैवत कालिका मातेच्या भेटीचा अनुपम सोहळा ‘याची देही याची डोळा’ पाहून भाविक धन्य झाले.
या देवस्थानचा भंडारा उत्सव नाथपंथीय परंपरेनुसार सुरू आहे. या उत्सवानिमित्त मठात मंगळवारी सायंकाळी उशिरा नाथसंप्रदायाच्या विविध धार्मिक कार्यक्रमांना विधिवत
सुरुवात झाली. यावेळी विधीनुसार पूजा-मांड घालून मंत्रोच्चार म्हणून घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर सिद्ध महापुरुषाच्या दर्शनासह नवस बोलणे व फेडणे यासाठी भाविकांची रात्री उशिरापर्यंत गर्दी होती.
रात्री साडेअकराच्या सुमारास ग्रामदैवत कालिका मंदिरातून देवीच्या उत्सव मूर्तीसह तरंग सवाद्य पालखी सिद्ध महापुरुषाच्या समाधीकडे रवाना झाली. या पालखी मिरवणुकीत शेकडो भाविक सहभागी झाले होते. पालखी मिरवणुकीचे महिलांनी औक्षण केले. नंतर सिद्ध महापुरुष आणि कालिका मातेच्या अविस्मरणीय भेटीचा क्षण पाहून हजारो भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. यावेळी राखण रखवालीसाठी गाऱ्हाणे घालण्यात आले. मध्यरात्री ओटवणे येथील दशावतारी कलाकारांच्या नाटकाचा भाविकांनी लाभघेतला.
सावंतवाडी संस्थानशी मठाचे नाते
भंडारा उत्सवाचा प्रसाद अर्थात सांदणीचे कारिवडे तसेच ओटवणे देवस्थानच्या मानकऱ्यांना देण्यात आला. या भंडारा उत्सवाशी सावंतवाडी संस्थानचा ऐतिहासिक संदर्भ असल्यामुळे सावंतवाडी येथील सावंत भोसले राजघराण्यालाही हा प्रसाद देण्यात आला. सावंतवाडी संस्थानशीही या मठाचे नाते आहे. बुधवारी सायंकाळी या मठातून कालिकादेवीच्या उत्सव मूर्तीसह तरंग व पालखीचे कालिका मंदिरात प्रस्थान झाल्यानंतर या भंडारा उत्सवाची सांगता नाथसंप्रदायातील विविध परंपरांचे पालन करून झाली.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

