कोकणमहाराष्ट्रमालवणसिंधुदुर्ग

🛑मालवणात हिंदुधर्मरक्षक श्रीमंत भागोजीशेठ कीर जन्मोत्सव सोहळा नियोजन सभा संपन्न.

*🛑मालवणात हिंदुधर्मरक्षक श्रीमंत भागोजीशेठ कीर जन्मोत्सव सोहळा नियोजन सभा संपन्न.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : नितीन गावडे*

 

*🎴मालवण, दि- १४:-* हिंदू धर्मरक्षक श्रीमंत भागोजीशेठ कीर यांचा जन्मोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे महाशिवरात्री दिनाला मुंबई येथे संपन्न होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या दैवज्ञ भवन सभागृहात नियोजन बैठक संपन्न झाली. या सभेला भागोजीशेठ कीर स्मृती समिती उपाध्यक्ष व राष्ट्रसंत प. पू पाचलेगांवकर महाराजांचे शिष्य श्रीकांत सावंत यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती होती. यावेळी मालवणचे माजी उपनगराध्यक्ष श्री. महेश जावकर, सिंधुदुर्ग जिल्हा अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे अध्यक्ष श्री. हेमंत करंगुटकर, अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे विश्वस्त लक्ष्मण (बाबू) सावंत व सामाजिक कार्यकर्त्या श्रीम. नीलम शिंदे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना श्रीकांत सावंत यांनी सांगितले की हिंदू धर्मरक्षक श्रीमंत भागोजीशेठ कीर यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त त्यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी भागोजीशेठ कीर स्मृती समिती यांच्या वतीने २६ फेब्रुवारी रोजी भव्य शोभा यात्रा व अभिवादन सभा संपन्न होत आहे. मालवण तसेच जिल्ह्यातील सकल हिंदू परिवार व मित्रमंडळी यांनी जास्तीत जास्त संख्येने त्यात सहभागी व्हावे. भव्य शोभायात्रा बुधवार दि. २६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता बंगाल केमीकल नाका( सेंच्युरी बाजार)वरळी ते भागोजी कीर स्मृतीस्थळ, दादर चौपाटी अशी काढण्यात येणार असून संध्याकाळी ६.३० वाजता अभिषेक व अभिवादन सोहळा असा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.

माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन युवा सामाजिक कार्यकर्ते ऐश्वर्य मांजरेकर यांनी केले. सभेच्या आयोजनाला सहकार्य केल्याबद्दल भागोजीशेठ स्मृती समिती उपाध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर व दैवज्ञ भवन यांचे विशेष आभार मानले.

या सभेला श्रीकांत सावंत,महेश जावकर, हेमंत करंगुटकर, लक्ष्मण ( बाबू) सावंत, नीलम शिंदे, ऐश्वर्य मांजरेकर यांच्यासह रवींद्र तळाशीलकर, राजेंद्र आंबेरकर, श्रीकांत वेंगुर्लेकर, ए.व्ही. गवंडे, भाऊ साळगावकर, पंकज पेडणेकर, संजय गावडे, बाळू नाटेकर, अरुण तोडणकर, रत्नाकर कोळंबकर, अंकित कोवळे, सुशांत भोजने, आशा वळपी, अंजना दत्तप्रसाद सामंत, क्रांती धुरी, प्रियांका मेस्त्री आदी उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!