कोकणरत्नागिरीशासकीयसामाजिक

प्रजासत्ताक दिनी अपरांत हॉस्पिटल ला विशेष शासकीय सन्मान..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण,दि.२७: वैद्यकीय क्षेत्रात अल्पावधीतच “चिपळूण ची आरोग्य वाहिनी” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अपरांत हॉस्पिटल मध्ये नेहमीच समाज उपयोगी विविध उपक्रम राबविले जात असतात,त्यातून अनेक रुग्णांना योग्य निदान व योग्य उपचार माफक दरात दिले जातातच.शिवाय कोरोनाच्या गंभीर काळात देखील अविरत आणि रुग्णांना सुरक्षित अशी वैद्यकीय सेवा व सुविधा दिल्या गेल्या व त्याचा अनेक रुग्णांना फायदा होऊन मोठा दिलासा मिळाला.

तसेच गेल्या काही महिन्यांपासून अपरांत हॉस्पिटल येथे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजना सुरू करण्यात आली आणि या योजनेअंतर्गत गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या रुग्णांना सेवाभावी वृत्तीने व पारदर्शक पध्दतीने  मोफत उपचार पुरवुन आर्थिक चणचणीच्या सध्याच्या काळात एका परीने सामाजिक बांधिलकीचे व्रत पाळले.
या उल्लेखनीय व कौतुकास्पद अशा समाजाभिमुख कामगिरीस्तव अपरांत हॉस्पिटल चा आज २६ जानेवारी २०२१ या  भारताच्या ७० व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष शासकीय सन्मान रत्नागिरीच्या शिवाजी स्टेडियम येथे आदरणीय पालकमंत्री यांचे हस्ते करण्यात आला.

हा सन्मान अपरांत हॉस्पिटल चे डायरेक्टर डॉ.शेखर पालकर, हॉस्पिटल ऍडमिन अमर भोसले, रुग्ण संपर्क अधिकारी कृष्णमूर्ती कुट्टण, TPA एक्सिक्युटिव्ह अनिकेत राजेशिर्के यांनी स्वीकारला.त्याच बरोबर योजना नागरिकांपर्यंत व्यवस्थित पोहोचवण्यासाठी व रुग्णांना त्यानुसार सेवा मिळण्यासाठी अपरांत हॉस्पिटल मधील डॉ.स्मृती कुलकर्णी, डॉ.लाजीम जमादार,नर्सिंग इंचार्ज नीता जाधव, श्रेया पाटेकर, PRO जवाहर चंदनशिवे, श्री राजेश दांडेकर, श्री सचिन मोरे, सौ.रुपाली पंडित व सौ उन्नती वैद्य यांचे सहकार्य लाभले.

अपरांत हॉस्पिटल चे   डॉ.वैशाली जाधव, डॉ.यतीन जधाव, डॉ विजय रीळकर डॉ.यशवंत देशमुख, डॉ.अब्बास जबले, डॉ विकास नातू, डॉ.गोपीचंद वाघमारे, श्री जितेंद्र सुर्वे, श्री प्रशांत पाटेकर, डॉ. निकेत कासार या प्रभृतींनी या सन्मानाबद्दल अपरांत स्टाफ व डॉक्टरांचे विशेष कौतुक केले आहे.

_*🔥वर्षभराची जाहिरात केवळ १५ ते २० रुपयात..💥*_

💫डेट कॅलेंडर १५ रुपये (६ पानी आर्ट पेपर) (फर्मच्या नावे छपाई २०० पासून) साईज 10″×15″
💫पॉकेट डायरी २० रुपये (रेक्झीन कवर, छपाईसहित)
💫 विविध प्रकारच्या डेट डायऱ्या..
💫टेबल कॅलेंडर्स ५५ रुपये पासुन..
💫पॉलि कॅलेंडर्स १२ रुपये पासुन..
💫आधुनिक प्रकारचे नायलॉन, प्रिइंक शिक्के..

_*🌈खास एल.आय.सी. एजंट साठी उपयुक्त डेट कॅलेंडर व फाईल्स; शिवाय विविध प्रकारच्या भेटवस्तू 🤷🏻‍♂️*_

*💁🏻‍♂️ आमचा पत्ता ⬇️*
प्रसाद ऑफसेट, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*🙋🏻‍♂️मोबाईल नंबर ⬇️*
_*📱7057956111*_
_*📱9422065195*_
*💁🏻‍♀️ व्हाट्सअप नंबर ⬇️*
_*📲9822856111*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!