कोकणरत्नागिरीशासकीयसामाजिक

चिपळूण तालुका मुस्लिम समाज या संस्थेचा विशेष शासकीय सन्मान..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि.२७: कोरोना काळात प्रशासनास उत्तम सहकार्य करून चांगले  सेवा कार्य  केल्याबद्दल प्रजासत्ताकदिनी चिपळूण तालुका मुस्लिम समाज या संस्थेचा विशेष शासकीय सन्मान करण्यात आला. गेली काही वर्षे ही संस्था सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. ही संस्था नेहमीच समाजपयोगी उपक्रम राबवत आली आहे. या संस्थेने कोरोना काळात विशेष कामगिरी केली आहे. कोरोना बाधित रुग्णांना योग्य सेवा देण्याबरोबरच कामथे उपजिल्हा रुग्णालयाचे रुपडे पालटण्यास मोठे योगदान दिले आहे. याबद्दल येथील प्रशासनातर्फे चिपळूण तालुका मुस्लिम समाज या संस्थेचा शासकीय सन्मान करण्यात आला. हा सन्मान प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्याकडून संस्थेचे अध्यक्ष हसन वांगडे, सचिव नाजीमभाई अफवारे, कार्याध्यक्ष इब्राहिम दलवाई यांनी स्वीकारला. यावेळी  सोबत आमदार शेखर निकम, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी व तहसीलदार जयराज सुर्यवंशी, मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते  आदी उपस्थित होते.

तसेच प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाला माजी आमदार रमेश कदम, सदानंद चव्हाण, चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष जयंदरथ खताते, जिल्हाप्रमुख सचिन कदम, सभापती धनश्री शिंदे, सदस्य राकेश शिंदे, नगरसेवक शशिकांत मोदी, उमेश सकपाळ, चिपळूण नागरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव, माजी नगराध्यक्ष सुचय रेडीज, विलास चिपळूणकर, सचिन साडविलकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव, निवासी नायब तहसिलदार तानाजी शेजाळ, प्रकाश सावंत आदी उपस्थित होते.

*_💥सावंतवाडी शहरात तुकाराम परब यांचे दर्जेदार चिकन सेंटर.._💥*

           *🔥ग्रंथा चिकन सेंटर🔥*

_🌈आमच्या येथे बॉयलर व गावठी कोंबडी विकत मिळतील.._

*🤷🏻‍♂️आमचा पत्ता ⬇️*
प्रोप्रायटर – तुकाराम परब
पाटणकर-चौगुले तिठा, बिरोडकर टेंब, बाबा बिरोडकर मार्ग, न्यू सबनीस वाडा, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*💁🏻‍♂️मोबाईल नंबर ⬇️*
*_📱९४२०२६१५८४_*
*_📱९४०३७०१५८५_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!