आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 सोनुर्ली पाक्याचीवाडी येथील भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळोत्सव उत्साहात साजरा

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ

🎴सावंतवाडी, दि-२२:– सोनुर्ली पाक्याचीवाडी येथील श्री देवी भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळोत्सव मंगळवारी उत्साहात पार पडला. सकाळ पासुन रात्री उशिरापर्यंत देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

सोनुर्ली पाक्याचीवाडी येथे हिराप बंधूची कुलदेवता म्हणून श्री देवी भवानी मातेचे मंदिर आहे. समस्थ सोनुर्ली ग्रामस्थ व भाविक देवीचा गोंधळोत्सव एकत्र येथे मोठ्या उत्साहात दर तीन वर्षानी साजरा करत असतात. यावर्षी काल मंगळवारी हा उत्सव साजरा झाला. यानिमित्त सकाळी देवीची विधीवत पुजा पार पडल्यानंतर दुपारी बकरा मानविण्याचा कार्यक्रम गावचे प्रमुख मानकरी यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यानंतर देवीचे दर्शन ओटी भरणे, केळी-नारळ ठेवणे आदी कार्यक्रमाला सुरवात झाली. सायंकाळी चार वाजता महाप्रसादाला सुरवात झाली. शेकडो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. रात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम सुरु होता. त्यानंतर रात्री गोंधळाच्या मुख्य कार्यक्रमाला सुरवात झाली. यावेळी प्रथेप्रमाणे मांडमाडावळ आदी झाल्यानंतर गोंधळ घालण्याचा व देवीची मशाल फिरविण्याचा कार्यकम झाला. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी व ग्रामस्थ मंडळीनी गर्दी केली होती. हा कार्यक्रम तब्बल दोन अडीज तास सुरु होता. दरम्यान गोवा मुंबई येथील भाविक भक्तांसह राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रातील भाविकांनी उपस्थिती दर्शवित देवी भवानीचे दर्शन घेतले.

गोंधळ घालण्याचा कार्यक्रमानंतर वालावलकर दशावतार कंपनीचा दशावतारी नाट्यप्रयोग झाला. त्यानंतर पहाटे पुन्हा गोंधळ घालणे व देवीची मशाल फिरविण्याचा कार्यक्रमानंतर आणि देवीच्या अवसाराच्या कौलाने या उत्सवाची सांगता झाली. दर तीन वर्षानी होणाऱ्या या उत्सवासाठी मुंबईस्थित हिराप बंधू व ग्रामस्थ खास गावी दाखल झाले होते. एकप्रकारे भक्तिमय वातावरणात मंदिर परिसरात पाहायला मिळाले होते. सोनुर्ली परिसरातील भाविकांनी या उत्सवाचा लाभ घेतला.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!