कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑मुक्ताई ॲकेडमीच्या जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेला विदयार्थ्यांचा मोठा प्रतिसाद!

*🛑मुक्ताई ॲकेडमीच्या जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेला विदयार्थ्यांचा मोठा प्रतिसाद!*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २०:-* मुक्ताई ॲकेडमीने कै.सरोज सुर्यकांत पेडणेकर यांच्या स्मरणार्थ 14 वर्षाखालील विदयार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेत मुला-मुलींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.पहीली ते आठवीच्या चौ-याहत्तर स्पर्धकांनी सहभाग घेत आपल्या उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं.स्पर्धेचे आयोजन सावंतवाडीतील श्री.पंचम खेमराज महाविदयालय येथे करण्यात आले.स्पर्धेचे उदघाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री.जयप्रकाश सावंत, कोकण लाईव्ह न्युज चॅनेलचे संपादक श्री.सिताराम गावडे, जनार्दन लक्ष्मण शिर्सेकर शिक्षण संस्थेच्या श्रीमती अनुपमा शेटगे या मान्यवरांच्या हस्ते आणि मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष श्री.कौस्तुभ पेडणेकर, उपाध्यक्षा सौ.स्नेहा पेडणेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.जयप्रकाश सावंत यांनी मुलांना स्पर्धेसाठी शुभेच्छा देताना खेळण्यातील आनंद घेण्यास सांगितले.तसेच मुक्ताई ॲकेडमीची मुले राष्ट्रीय स्तरावर मिळवत असलेल्या यशाचे कौतुक करत ॲकेडमीच्या उपक्रमांचा, प्रशिक्षणाचा मुलांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.प्रमुख पाहुणे श्री.सिताराम गावडे यांनी मुलांना मोबाईल पासून लांब राहण्यास सांगुन मन एकाग्र करणा-या बुदधिबळ सारख्या खेळाकडे मुलांनी वळावे असे आवाहन केले.मुक्ताई ॲकेडमीने मागील दहा वर्षांपासून मुलांना एक व्यासपीठ मिळवून दिल्याचे देखील त्यांनी नमूद केले.

मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष श्री.कौस्तुभ पेडणेकर यांनी मागील दहा वर्षातील ॲकेडमीच्या कार्याचा आढावा घेताना पुढील काळात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील मुलांसाठी उपक्रम राबविणार असल्याचे जाहीर केले.यावेळी जिल्ह्यातील सर्वात लहान, मुक्ताई ॲकेडमीचा राष्ट्रीय खेळाडू यश सावंत आणि राष्ट्रीय खेळाडू यथार्थ डांगी, विभव राऊळ यांनी आंतरराष्ट्रीय रेटींग मिळवल्याबददल त्यांचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲकेडमीची राष्ट्रीय खेळाडू गार्गी सावंत हीने केले.आभार प्रदर्शन सौ.स्नेहा पेडणेकर यांनी केले.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!