कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑भोसले नॉलेज सिटीमध्ये ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा

*🛑भोसले नॉलेज सिटीमध्ये ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज:कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २०:-* येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रम मोठ्या उत्साहात झाला. यावेळी विद्यार्थ्यांचे सामूहिक वाचन, पुस्तक प्रदर्शन आणि आवडत्या पुस्तकावर परिक्षणात्मक निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. उद्घाटन प्राचार्य डॉ. रमण बाणे यांच्या हस्ते करण्यात आले. पुस्तक प्रदर्शनात थोर व्यक्तींची चरित्रे, आत्मचरित्रे, कथा-कादंबऱ्या, व्यक्तिमत्त्व विकास, प्रेरणादायी ग्रंथ, संदर्भ ग्रंथ व ललित साहित्याची मांडणी करण्यात आली होती. मराठी, हिंदी व इंग्रजी अशा सर्व भाषांतील साहित्य यावेळी उपलब्ध होते.

पुस्तक परीक्षण स्पर्धेत डिग्री व डिप्लोमा इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यामध्ये डिग्री विभागातून कोमल सोनावणे (इनव्हीजीबल सिटीज) हिने प्रथम, आर्या प्रभूदेसाई (माझी जन्मठेप) हिने द्वितीय, सानिया गावडे (सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल) हिने तृतीय तर हर्षाली आळवे (यू आर बॉर्न टू ब्लॉसम) हिने उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला. डिप्लोमा विभागातून मनिष सावंत (युगंधर) याने प्रथम, सायली गिरी (अग्निपंख) हिने द्वितीय, तनया दळवी (मन में है विश्वास) हिने तृतीय तर संदेश बेळेकर (रिच डेंड पुअर डॅड) याने उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला. विजेत्या स्पर्धकांना प्राचार्य डॉ. रमण बाणे व उपप्राचार्य गजानन भोसले यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यावेळी डिप्लोमा मेकॅनिकल विभाग प्रमुख अभिषेक राणे, डिग्री मेकॅनिकल विभाग प्रमुख स्वप्नील राऊळ, कॉम्प्युटर विभाग प्रमुख मनोज खाडिलकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संचिता कोलापते यांनी तर आयोजन ग्रंथपाल मानसी कुडतरकर व एनएसएस प्रमुख महेश पाटील यांनी केले.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!