🛑शेर्ले पूल जोडरस्त्याची तातडीने दुरुस्ती करा !
*🛑शेर्ले पूल जोडरस्त्याची तातडीने दुरुस्ती करा !*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴बांदा, दि- १८:-* बांदा शेर्ले रस्त्यावरील तेरेखोल नदीवर पूल बांधावे, अशी मडुरा पंचक्रोशीतील हजारो नागरिकांची शेकडो वर्षाची मागणी जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून नदीवर पूल बांधून पूर्ण करण्यात आली आहे. या पुलामुळे ग्रामस्थांची अनेक वर्षांची समस्या दूर झाल्याने ग्रामस्थांनी जीवन प्राधिकरणाचे ऋणही व्यक्त केले आहेत. मात्र, पुलाला जोडणारा दोन्ही बाजूचा रस्ता खराब झाल्याने रस्त्याचे दगड उखडून पडत आहेत. त्यामुळे छोटे-मोठे अपघात घडत असल्याने त्याकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी प्रजासत्ताकदिनी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. या संदर्भात महेश उर्फ पप्पू खोबरेकर व ग्रामस्थांनी जीवन प्राधिकरणाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मडुरा पंचक्रोशीची अनेक वर्षाची मागणी आपण आपल्या खात्याच्या माध्यमातून पूर्ण केली आहे. मात्र, पुलाला जोडणारा दोन्ही बाजूचा रस्ता माती व खडीकरण खराब झाल्याने सतत दुचाकीचे अपघात होत आहेत. सदर रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करूनही दुर्लक्ष होत असल्याने रस्त्याच्या दुर्दशेकडे लक्ष वेधण्यासाठी लोकशाही मार्गाचा अवलंब करून सनदशील मार्गाने येत्या प्रजासत्ताकदिनी रस्त्यानजीक उपोषण करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. या निवेदनावर पत्रकार मोहन जाधव, उपसरपंच दीपक नाईक यांच्यासह महेश उर्फ पप्पू खोबरेकर, राजेश चव्हाण, अंकुश जाधव, विराज नेवगी, लवू सावळ, भारती चव्हाण, अजित शेर्लेकर, उमेश जाधव, रितेश जाधव, भिकाजी धुरी, अरुण धुरी, देऊ माळगवकर, अनिल मळगावकर, फजल रखानजी, अनिशा शेर्लेकर, चैतन्य चांदेकर अशा सुमारे ९० जणांच्या सह्या आहेत. दरम्यान, शेर्ले ग्रामपंचायतीच्या शुक्रवारी झालेल्या विशेष ग्रामसभेतही या रस्त्याबाबत चर्चा करून सर्व ग्रामस्थांनीही या उपोषणाला जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

