कृषिकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

मडुरा व शेर्ले येथे काजू बागांचे सर्वेक्षण

*🛑मडुरा व शेर्ले येथे काजू बागांचे सर्वेक्षण*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- ०३:-* फलोत्पादन पिकावरील किड रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) योजनेअंतर्गत सावंतवाडी तालुक्यातील कृषि विभाग सावंतवाडी, बांदा मंडळ यांच्या कार्यक्षेत्रातील मडुरा व शेर्ले या गावातील काजू बागांना दिलेल्या सर्वेक्षण भेटीदरम्यान प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथील डॉ. गोपाळ गोळवणकर संशोधन सहयोगी हॉर्टसॅप प्रकल्प, श्री. अझमुद्दीन सरगुरू कृषि पर्यवेक्षक, श्रीम. मनाली परब कृषी पर्यवेक्षक, श्रीम. पल्लवी सावंत कृषी सहाय्यक मडुरा, श्रीम. श्वेता बेलगुंदकर कृषी सहाय्यक शेर्ले व शेतकरी उपस्थित होते.

मडुरा व शेर्ले या दोन गावातील प्रत्येकी २ अशा एकूण ४ काजू बागांमध्ये पाहणी केले असता मोहोरलेल्या अवस्थेत दिसून आले. बागा स्वच्छ असून ढेकण्या किडीसाठी प्रोफेनोफॉस ५० टक्के प्रवाही याची १० मिली/ली व ढगाळ हवामान असल्यास करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डॅझिम १० ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड २५ ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करण्यास सूचित केले. रोठा काजूच्या रोठा किडीसाठी प्राथमिक अवस्थेत करावयाच्या उपाययोजना करण्यास उद्युक्त केले. शेतकर्‍यांना बागेची स्वच्छता व नियमित सर्वेक्षण याविषयी महत्व पटवून दिले.

शास्त्रज्ञ व कृषि विभागाचे अधिकारी व शेतकरी यांनी काजू बागेत वारंवार येणार्‍या समस्या यावर सखोल चर्चा केली. प्रक्षेत्र भेटीदरम्यान शेतकर्‍यांना डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली यांनी शिफारस केलेले आंबा व काजू मोहोर संरक्षण वेळापत्रक शेतकर्‍यांना वितरित करण्यात आले.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

 

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

 

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

 

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*

🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत

🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक

💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या

❄️ वातानुकूलित वर्गखोल्या

🚌 बस आणि वसतिगृहाची सोय

💻 संगणकीय प्रयोगशाळा

📙 ग्रंथालयाची सुविधा

🧪 सुसज्ज प्रयोगशाळा

⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद

🗒️ यशस्वी निकालाची परंपरा

▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग

⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन

🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा

🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश

👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

 

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

 

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

 

☎️ संपर्क :

9158788345

8788101853

9405238763

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!