कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

कॅन्सर, मधुमेह,या रोंगावार प्रभावी ठरलेल्या सप्तरंगी वनस्पतीची कुभ़वडे गावातून केली जाते तस्करी

*🛑कॅन्सर, मधुमेह,या रोंगावार प्रभावी ठरलेल्या सप्तरंगी वनस्पतीची कुभ़वडे गावातून केली जाते तस्करी*

 

*🛑या सप्तरंगी झाडाच्या तस्करीतून मिळतेय मोठे घबाड म्हणून ढवळे झाले गब्बर*

 

*🛑वनविभागाचे अधिकारी मलिदा खाऊन सुशेगाद.वनक्षेत्रातून होतेय तोड*

 

 

*🛑जिल्ह्या बाहेरील ढवळे,पवळे आपल्या एजंटाकरवी करताहेत तस्करी*

 

*🛑यापुर्वीही आंबोली भागातून झाली होती सप्तरंगीची मोठ्या प्रमाणात तस्करी*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०३:-* सप्तरंगी ही मधुमेहावर,बीपी,व कॅन्सर वर गुणकारी व रामबाण उपाय म्हणून सिध्द झालेली अतीशय दुर्मिळ अशी वनस्पीची सध्या मोठ्या प्रमाणात तक्सरी होत आहे, सावंतवाडी तालुक्यातील कुंभवडे या अतीदुर्गम भागात ही वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळत आहे व या वनस्पतीची तस्करी स्थानिकांच्या हातावर थोडी फार रक्कम टेकवून,वनविभागाला हाताशी धरून केली जात आहे, याबाबत आंबोली चौकुळ जिल्हा परिषद मतदारसंघाचे सामाजिक कार्यकर्ते व शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी दिनेश गावडे यांनी आवाज उठवला आहे.

अशी ही बहुगुणी वनौषधी आंबोली, चौकुळ,कुंभवडे या सह्याद्रीच्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात आढळते व ही वनस्पती मोठ्या दराने किलोच्या दरावर विकली जाते,या तिन्ही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात संरक्षीत वने आहेत व ही जंगले वनविभागाच्या ताब्यात आहेत,असे असताना वनविभागाचे अधिकारी मोठी रक्कम घेऊन डोळ्यावर गांधारीची पटृटी बांधून आहेत.. एरवी जळणासाठी लाकडे तोडण्यासाठी स्वताच्याच पण नजर चुकीने वनविभागाचे नाव लागलेल्या जमिनीत तर स्थानिक रहिवाशांचे पाळ कोयते जप्त करणारे वणमजदूर,त्यांचे वरीष्ठ अधिकारी एवढ्या मोठ्या प्रमाणात सप्तरंगी झाडे मुळासकट उपटून घेऊन जात असताना दातखिळी बसल्यागत गप्प का?असा प्रक्ष सर्वसामान्य रहिवाशांना पडला आहे, वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या घरातून या सप्तरंगी मुळे हल्ली सोन्याचा धूर येऊ लागला आहे.

सप्तरंगी ही भारतात, प्रामुख्याने पश्चिम घाटात सापडणारी व मधुमेहावर औषध म्हणून वापरली जाणारी एक दुर्मिळ होत चाललेली वनस्पती आहे. ही वनस्पती तुलनेने कमी पाऊस पडणाऱ्या भागांतही तग धरते, असे आढळले आहे. हल्ली कर्करोगावरील औषधी उपयोगासाठी सप्तरंगी वनस्पतीची अवैध पद्धतीने बेसुमार तोड झाली आहे.

सप्तरंगी हे या वनस्पतीचे व्यापारी नाव आहे. सप्तरंगी ही महाराष्ट्राच्या काही भागांत इंगळी किंवा निसूल या नावानेही ओळखली जाते. हिचे शास्त्रीय नाव सॅलॅसिया चायनेन्सिस असे आहे.हिचा सरळ किंवा वेडावाकडा वाढणारा वृक्ष अथवा मोठे काष्ठयुक्त झुडूप अंदमान बेटांसहित भारतात सर्वत्र आढळते. ते समुद्रकिनारी, नदीनाल्यांच्या काठी, तसेच जंगलांत समुद्रसपाटीवर ७५० मी. उंचीपर्यंत जोमाने वाढते. पाने अंडाकृती ते कुंतसम (भाल्यासारखी), फुले पिवळसर असून २-६ च्या झुपक्यांनी बगलेत येतात. फळ लहान, गोलसर, १-२ सेंमी. व्यासाचे व पिकल्यावर लाल होणारे असते. त्यात एकच बी असते. बी खादय गराने वेढलेले असते. पिकलेली फळे खातात.

अशी ही बहुगुणी वनौषधी आंबोली, चौकुळ,कुंभवडे या सह्याद्रीच्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात आढळते व ही वनस्पती मोठ्या दराने किलोच्या दरावर विकली जाते,या तिन्ही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात संरक्षीत वने आहेत व ही जंगले वनविभागाच्या ताब्यात आहेत,असे असताना वनविभागाचे अधिकारी मोठी रक्कम घेऊन डोळ्यावर गांधारीची पटृटी बांधून आहेत.. एरवी जळणासाठी लाकडे तोडण्यासाठी स्वताच्याच पण नजर चुकीने वनविभागाचे नाव लागलेल्या जमिनीत तर स्थानिक रहिवाशांचे पाळ कोयते जप्त करणारे वणमजदूर,त्यांचे वरीष्ठ अधिकारी एवढ्या मोठ्या प्रमाणात सप्तरंगी झाडे मुळासकट उपटून घेऊन जात असताना दातखिळी बसल्यागत गप्प का?असा प्रक्ष सर्वसामान्यांना पडला आहे.

भारतीय वैदयक पद्धतीत सप्तरंगीच्या मुळांचा उपयोग मधुमेहविरोधी म्हणून करतात व नैदानिक चाचण्यांमध्ये त्याचा परिणामकारकपणा असल्याचे म्हटले आहे. मुळाच्या सालीत दोन १, ३- डायकिटोने [C30H4803 व C30H4603], स्निग्धांशयुक्त द्रव्य, रबर, डल्सिटॉल, मॅजिफेरीन, फ्लोबॅटॅनीज व ग्लुकोसायडी टॅनिने असतात. मुळांत ल्यूकोपेलार्गोनिडीन आणि त्याचे द्विवारिक व चतुर्वारिक हे असतात. मुळे स्तंभक (आकुंचन करणारी)

असतात. ती गर्भपातक असून अनार्तव व शूलार्तव (कष्टार्तव) व गुप्तरोगांत उपयुक्त असतात. खोडात गटापर्चा, डल्सिटॉल व ल्यूकोपेलार्मोनिडिनाचे द्विवारिकही असतात. पानांतही गटापर्चा असतो. तसेच सालीत व पानांत ट्रायटर्पिनांचे अस्तित्व आढळले आहे.

लेंडफळ सॅ. मॅकोस्पर्मा ही जाती पश्चिम घाटात कोकणापासून

लेंडफळ सॅ. मॅकोस्पर्मा ही जाती पश्चिम घाटात कोकणापासून दक्षिणेस आढळते. तिची फळे गोलसर, नारिंगी रंगाची व ३ सेंमी. व्यासाची असून त्यांचा गर स्वादयुक्त असतो.

संशोधकांना सप्तरंगीच्या मुळांबरोबरच खोड आणि पाना-बियांतही औषधी गुणधर्म सापडल्याने औषध निर्मितीच्या दृष्टीने सप्तरंगीचे उत्पादन महत्त्वाचे ठरले आहे. यासंबंधी पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या जैवविविधता विभागातील डॉ. अंकुर पटवर्धन, मकरंद पिंपुटकर आणि राधिका जोशी या संशोधकांचे सप्तरंगी वनस्पतीतील मधुमेहावर नियंत्रण ठेवणाऱ्या गुणधर्मावरील संशोधन बायोडायव्हर्सिटी बायोस्पेक्टिंग अॅन्ड डेव्हलपमेंट या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.

यामुळे या सप्तरंगी झाडाच्या खोडाला देशात ,प्रदेशात ,मोठ्या प्रमाणात मागणी असून लाखो रुपये किमतीला या झाडांची खोडे मुळे विकली जात आहेत, किलोमागे सुमारे दोन ते तीन हजार रुपये दर मिळत असल्याचे माहिती उपलब्ध झाली आहे, त्यामुळे या झाडांची तस्करी करणारे एजंट ढवळे ,पवळे, जागृत झाले आहेत व त्यांनी आपल्या एजंटा करवी सह्याद्री पट्ट्यात अशा प्रकारची झाडे शोधून काढून तेथील नागरिकांच्या हातावर नाममात्र रक्कम टेकवून वन विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांना मोठ्या प्रमाणात मदिदा देऊन शांत करून या झाडांची तस्करी केली जात आहे. याबाबत चौकुळ येथील सामाजिक कार्यकर्ते व शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी दिनेश गावडे यांनी या दुर्मिळ होत चाललेल्या वनस्पतींचे संवर्धन होणे ही काळाची गरज असल्याने याबाबत आवाज उठविला आहे , वनविभागचे अधिकारी स्थानिक नागरिकांना बारीक-सारीक कारणावरून त्रास देतात या ठिकाणी जिल्ह्याबाहेरील व्यक्ती आमच्या गावात येऊन मोठ्या प्रमाणात या झाडांची तस्करी करत असतानाही वनविभाग मूग गिळून गप्प का आहे? असा सवाल उपस्थित करत याविरुद्ध जन लढा उभारण्याचे दिनेश गावडे यांनी निश्चित केले आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!