निश्चित प्लॉटधारक शेतकर्यांसाठी आयोजित प्रशिक्षण व प्रक्षेत्र भेटीला उत्स्फूर्त प्रतिसाद
*🛑निश्चित प्लॉटधारक शेतकर्यांसाठी आयोजित प्रशिक्षण व प्रक्षेत्र भेटीला उत्स्फूर्त प्रतिसाद*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि- ०१:-* महाराष्ट्र शासनाच्या फलोत्पादन पिकावरील किड रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) “आंबा व काजू पिक” सन २०२४-२५ अंतर्गत, वैभववाडी तालुक्यातील आंबा व काजू पीक निश्चित प्लॉटधारक शेतकर्यांसाठी तालुकास्तरीय कार्यशाळा बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन, वैभववाडी येथे संपन्न झाली.
या कार्यशाळेस निरंजन देशमुख वैभववाडी तालुका कृषि अधिकारी, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथील डॉ. गोपाळ गोळवणकर संशोधन सहयोगी, राकेश हुले वैभववाडी तालुका आत्मा यंत्रणा व्यवस्थापक, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक, कृषि सेवक व निश्चित प्लॉटधारक शेतकरी उपस्थित होते.
निरंजन देशमुख यांनी या कार्यशाळेचा उद्देश व महत्व अधोरीखित केले. त्यासोबत शेतकर्यांना आंबा व काजू पिकाबाबत भौगोलिक मानांकन प्रक्रिया, शेतमाल साठवणूक, विक्री व काढणीपश्च्यात प्रकिया उद्योग केंद्र शासन सहाय्यित पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची विस्तृत माहिती दिली. या कार्यशाळेच्या तांत्रिक सत्रात प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथील शास्त्रज्ञ डॉ. गोपाळ गोळवणकर यांनी काजू व आंबा पिकावरील किडी-रोगांची ओळख व एकात्मिक नियंत्रण, कीटकनाशकांचा गरजेनुसार वापर, फवारणीचे तंत्र तसेच बागांमध्ये स्वच्छता व सर्वेक्षणाचे महत्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रगतशील शेतकरी प्रकाश साईल यांनी शेतकर्यांमध्ये सेंद्रिय पद्धतीने पीक संरक्षण व एकात्मिक पीक संरक्षणाबाबत शेतकर्यांमध्ये जनजागृती यावर आपले मत व्यक्त केले.
या कार्यशाळेच्या दुसर्या सत्रात कोकिसरे गावातील १ आंबा व ४ काजू बागांमध्ये सर्वेक्षण भेटी देऊन शेतकर्यांना प्रत्यक्ष काजू व आंबा पिकातील कीड रोग कसे ओळखावे व त्यांचे व्यवस्थापन कसे करावे याचे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. ए. आर. पाटील कृषि पर्यवेक्षक यांनी केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरीता कृषि विभाग अधिकारी वर्गाने अथक परिश्रम घेतले. प्रशिक्षण कार्यक्रमाला तालुक्यातील निश्चित प्लॉटधारक शेतकर्यांनी मोठी उपस्थिती लावली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

