Uncategorizedकोकणदोडामार्गमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

दोडामार्ग शहरासाठी निधी कमी पडून देणार नाही!*

*🛑दोडामार्ग शहरासाठी निधी कमी पडून देणार नाही!*

 

*🛑मत्स्य, बंदर विकासमंत्री नीतेश राणेंची ग्वाही : दोडामार्गातील व्यापारी, नागरिकांकडून राणेंचे अभिनंदन*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴दोडामार्ग, दि- ३१:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या दोडामार्ग शहराकडे आपले पूर्ण लक्ष आहे. या शहराची नगरपंचायत ही आमच्या पक्षाची असल्याच्या पार्श्वभूमीवर सहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे मत्स्य व बंदर विकासमंत्री नीतेश राणे यांनी दिली नगरसेवक संतोष नानचे तसेच शहरातील व्यापारी, नागरिक, युबक आदींनी मंत्री राणे यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. त्यावेळी ते बोलत होते.

कणकवली येथील ओम गणेश या निवासस्थानी मंत्री राणे यांची संतोष नानचे, दोडामार्ग तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष सागर शिरसाट, सुधीर चांदेलकर, विशांत परमेकर, सागर चांदेलकर, प्रवीण आरोंदेकर, ओमकार पेडणेकर शिवम पांचाळ आदींनी भेट घेतली.

मंत्रीपद मिळाल्याबद्दल नीतेश राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. त्यानंतर शहरातील अनेक विकासकामांकडे राणे यांचे लक्ष वेधले. बाजारपेठेतून आयीच्या दिशेने निघालेल्या रस्त्यालगत प्रभाग क्रमांक ११ व प्रभाग क्रमांक ८ हे आहेत. या रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची पूर्वीपासूनची घरे, दुकाने आहेत. मराठी प्राथमिक शाळा-बीएसएनएल टॉवरपर्यंतच्या भागात दरवर्षी पावसाळ्यात भर रस्त्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या अनेक वाहनचालक, पादचारी यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्याचबरोबर दोन्ही बाजूला गटारे नसल्याने नागरिकांच्या घर व दुकानामध्ये पाणी जाते व त्यांनाही त्रास होतो या रस्त्याची उंची काही प्रमाणात वाढविण्यात आलेली आहे. मात्र, तरीही हा त्रास जैसे थे राहिला असल्याकडे वरील सर्वांनी मंत्री राणे याचे लक्ष वेधले.

*नीतेश राणेंकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला विशेष सूचना*

दरम्यान मंत्री श्री राणे यांनी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. किणी यांच्याशी तात्काळ दूरध्वनीवरून संपर्क साधला व सदर रस्ता तसेच त्यातून उद्भवलेल्या समस्येकडे तातडीने लक्ष घालण्याची सूचना केली.

आवश्यक ते अंदाजपत्रक तयार करून प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात करण्याचे निर्देश मंत्री राणे यांनी दिले. दोडामार्ग शहराकडे नारायण राणे यांच्यासोबत आपले विशेष लक्ष असून शहराच्या विकासासाठी आवश्यक ती सर्व पाऊले उचलली जातील असेही श्री. राणे म्हणाले.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!