आनंदवाडी क्रिकेट स्पर्धा उद्यापासून
*🛑आनंदवाडी क्रिकेट स्पर्धा उद्यापासून*
*🛑विजेत्या संघाला ३ लाख ३३ हजार ३३३ रुपयांचे पारितोषिक, विविध राज्यांतील नामवंत खेळाडू होणार सहभागी, मॅच ऑफ दी सिरीजसाठी ‘मोटारसायकल’चे बक्षीस*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज:कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴देवगड, दि- ३१:-*आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ व आनंदवाडी क्रिकेट क्लबतर्फे आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी डे-नाईट टेनिसबॉल क्रिकेट प्रिमियर लीग स्पर्धेचे भव्य उद्घाटन १ जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता देवगड पोलीस स्थानकाच्या मैदानावर होणार आहे या स्पर्धेचे उद्घाटन देवगडचे प्रभारी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या हस्ते होणार आहे ही स्पर्धा ५ जानेवारीपर्यंत रंगणार आहे स्पर्धेत पश्चिम बंगाल, गुजरात, केरळ, राजस्थान, मध्यप्रदेश, हरियाणा, गोवा, दिल्ली व महाराष्ट्रातील नामवंत खेळाडू सहभागी झाले आहेत.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्षा साक्षी प्रभू देवगड फिशरमेन्स को-ऑप सोसायटीचे चेअरमन द्विजकांत कोयंडे, उद्योजक हनीफ मेमन, आकिब मुजावर (आचरा), सहदेव बापर्डेकर (मालवण), गोपीनाथ तांडेल (मालवण), सतीश आचरेकर (मालवण), ओमकार खंदारे (मालवण), नगरसेवक संतोष तारी, नगरसेविका तथा न पं पाणी पुरवठा सभापती अॅड प्रणाली माने, गावचे पाटील सुरेश धुरी आदी उपस्थित राहणार आहेत. विजेत्याला तीन लाख ३३ हजार ३३३ रुपये व आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी,उपविजेत्या संघास एक लाख ५५ हजार ५५५ रुपये व ट्रॉफी देण्यात येणार आहे मॅन ऑफ दी सिरीजसाठी आकर्षक मोटरसायकल, बॅट व ट्रॉफी बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज यांना रोख रक्कम, आकर्षक ट्रॉफी तसेच प्रत्येक सामन्यातील सामनावीरास आकर्षक टॉफी व टी-शर्ट, आयपॉड देण्यात येणार आहे तर अंतिम सामन्यातील मॅन ऑफ दी मॅचसाठी रोख रक्कम, बॅट व आकर्षक ट्रॉफी देण्यात येणार आहे स्पर्धेत आयपीएल स्पर्धेतील समालोचक कुणाल दाते (मुंबई), चंदू शेटे (मुंबई), अशोक नाईक (सिंधुदुर्ग) हे समालोचन करणार आहेत. पंच म्हणून बाळा प्रभू (मुंबई), बंटी केरकर (मालवण), उमेश मांजरेकर (मालवण), अॅम्ब्रोज आल्मेडा (मालवण) हे काम पाहणार आहेत. क्रीडा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष प्रदीप कोयंडे व आनंदवाडी क्रिकेट क्लबचे अध्यक्ष गुरुनाथ तारी यांनी केले आहे.
*१ जानेवारी रोजी होणारे सामने* : १. श्रीतेज इलेव्हन- पुणे -भैराई देवी मैत्री पॅकर्स, मोड, २. एस. एम. एच. कराड तिरुपती- सावर्डे, ३. पहिल्या सामन्यातील विजेता दुसऱ्या सामन्यातील विजेता, ४. पहिल्या सामन्यातील पराभूत संघ दुसऱ्या सामन्यातील पराभूत संघ, ५. तिसऱ्या सामन्यातील विजेता पाचव्या सामन्यातील विजेता.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

