शिक्षक समितीचे आज कुडाळला आंदोलन
*🛑शिक्षक समितीचे आज कुडाळला आंदोलन*
*🛑नवीन शासनाकडून प्रश्न सुटण्याची अपेक्षा – शशांक आटक*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि- ३०:-* येणाऱ्या नवीन वर्षात विद्यार्थी, शाळा व पालक यांना निर्माण झालेले प्रश्न सुटण्यासाठी शासनाकडून प्रयत्न होतील, ही आमच्या मनात आशा आहे. नवीन शासनाकडून प्रश्न सुटतील, अशी आमची अपेक्षा आहे. एक राज्य-एक गणवेश योजनेतील असंख्य त्रुटी, प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेतील ऑनलाईन कामातील त्रुटी, नवीन संचमान्यता धोरणाचा सिंधुदुर्ग जिल्हयातील शाळांना बसणारा फटका, अशा ज्वलंत प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने नवीन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ३० डिसेंबर रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत कुडाळ पंचायतस मितीसमोर एक दिवशीय लाक्षणिक आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे कुडाळ तालुकाध्यक्ष शशांक आटक यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कुडाळ तालुका शाखेच्यावतीने येथील मराठा समाज सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी सचिव महेश गावडे, राज्य पदाधिकारी नामदेव जांभवडेकर व सचिन मदने, सल्लागार चंद्रकांत अणावकर, कायदेशीर सल्लागार संतोष वारंग, माजी जिल्हाध्यक्ष नंदकुमार राणे, संघटक स्वामी सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आटक म्हणाले, प्राथमिक शिक्षकांच्या अनेक समस्या आणि त्या समस्या सोडविण्यासाठी अनेक आंदोलने राज्यभर होत असतात. येणाऱ्या नवीन वर्षात तरी विद्यार्थ्यांशी – संबंधित समस्या प्रशासन व शासन स्तरावर सुटतील, या आशेनेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कुडाळ तालुका शाखेच्यावतीने फक्त विद्यार्थी व शाळा यांचेच प्रश्न घेऊन हे एक दिवशीय लाक्षणिक आंदोलन करीत आहोत. बालकांचा मोफत व सक्तीचा अधिकार अधिनियम २००९ वं भारतीय संविधानातील बालकाच्या शिक्षणाच्या मूलभूत हक्काचा अनुच्छेद २१ अ याचा वारंवार होणारा भंग संघटनेला न पटल्याने हे आंदोलन करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

