🛑 मळगाव येथील वेगवेगळ्या वाडीतील ग्रामस्थांचा गोठण जेवण दोन पूर्वस मंदिरात उत्साहात साजरा
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-२९:- मळगाव येथील वेगवेगळ्या वाडीतील ग्रामस्थांचा गोठण जेवण सोहळा दोन पूर्वस मंदिर येथे उत्साहात साजरा करण्यात आला. राऊळ बांधवांचा गोठण जेवण शनिवारी तर तेलकाटावाडी, राणे व गावकरवाडीतील ग्रामस्थांचा गोठण जेवण कार्यक्रम रविवारी झाला.
प्रत्येक गावातील शेतकरीबंधू दरवर्षी हा गोठण जेवण कार्यक्रम आपापल्या शेतीवाडी लगत आपल्या सोयीप्रमाणे करत असतात. रानटी प्राण्यांपासून आपल्या गुरांचे रक्षण व संवर्धन करणे, शेतीचे रक्षण व संवर्धन करणे, बाहेरच्या ईडापीडापासून संरक्षण करणे या उद्देशाने दरवर्षी हा गोठण जेवण कार्यक्रम केला जातो. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मळगाव येथील राऊळ बांधव व वरील सर्व वाडीतील ग्रामस्थांचा गोठण जेवण सोहळा श्री देव दोन पूर्वस मंदिर येथे उत्साहात साजरा झाला. यानिमित्त मंदिरात कार्यक्रमासाठी एकत्र आल्यावर ग्रामस्थांनी सर्वप्रथम दोन पूर्वस देवाचे दर्शन घेतले. यावेळी काहींनी केळी, नारळ, नवसाचे पेढे, लाडू अर्पण करुन विविध प्रकारची फुले वाहून दोन पूर्वस देवाची पूजा केली. पूजा झाल्यावर सामूहिक जेवण बनविण्यास प्रारंभ झाला. जेवण झाल्यावर दोन पूर्वस देवाला नैवेद्य दाखवून सामूहिक गाऱ्हाणे घालण्यात आले. गाऱ्हाणे झाल्यावर सामूहिक जेवणास प्रारंभ झाला. जेवणानंतर पुन्हा गाऱ्हाणे घालून प्रसाद वाटप करण्यात आले. मळगाव परिसरातील लोकांनी या गोठण जेवण कार्यक्रमाचा लाभ घेतला.
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

