कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

ठासणीच्या बंदूकीची गोळी लागून एक गंभीर जखमी -तिघांवर गुन्हा दाखल

*🛑ठासणीच्या बंदूकीची गोळी लागून एक गंभीर जखमी -तिघांवर गुन्हा दाखल*

 

*🛑पारपोलितील घटना -एक जण ताब्यात..शिकार भोवली*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज:कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २८:-* बंदुकीची गोळी लागून तरुण जखमी झाल्याचा प्रकार अखेर उघड झाला आहे याबाबतची माहिती अज्ञाताने दिल्यानंतर सावंतवाडी पोलिसांनी पारपोली गुरववाडी येथील तिघांवर गुन्हा दाखल करून मुख्य संशयिताला ताब्यात घेतले आहे.

ही घटना तीन दिवसापूर्वी घडली होती मात्र याबाबत पोलीस ठाणे अनभिज्ञ होते. याबाबतची माहिती अज्ञातांकडून देण्यात आल्यानंतर कारवाईची सूत्रे फिरली त्यानुसार आज सकाळी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आली.

याबाबतची तक्रार पोलीस हवालदार राजेश नाईक यांनी दिली असून त्यानुसार गोळीबार केल्याप्रकरणी वेदांत लक्ष्मण गुरव वय २२ सोबत असलेला रविकांत वसंत गुरव वय 40 याच्यासह जखमी कृष्णा अर्जुन गुरव वय 35 या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली.फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार यातील तिघेही संशयित आपल्या ताब्यातील विना परवाना ठासणीची बंदूक घेऊन शिकारीला जात होते यावेळी वेदांत याच्या हातातील बंदुकीची गोळी चुकून फायर झाली आणि ती कृष्णा याच्या पोटातून मांडीच्या भागाकडे गेली यात तो गभीर जखमी झाला.हा प्रकार लक्षात आल्यानंतर वाडीतील लोकांनी त्या तिघांना सावंतवाडी येथील उपजिल्हा रूग्णालयात आनले व तिथून गोवा बांबुळी येथे अधिक उपचारासाठी नेल्याचे चौकशीत उघड झाले.

त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित संशयितांनी वापरलेली बंदूक ही विना परवाना असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे या प्रकरणी आज सकाळी हा गुन्हा दाखल करण्यात आला व संशयित वेदांत गुरव याला ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!