कुडाळ येथे आंबापीक शेतीशाळा संपन्न
*🛑कुडाळ येथे आंबापीक शेतीशाळा संपन्न*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि- २७:-* महाराष्ट्र शासनाच्या फलोत्पादन पिकावरील किड रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) “आंबा पिक” सन २०२४-२५ अंतर्गत, कुडाळ तालुक्यातील गांधीनगर गावी आंबा पिकाची शेतीशाळा संपन्न झाली. या प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथील डॉ. गोपाळ गोळवणकर कीटकशास्त्रज्ञ व हॉर्टसॅप संशोधन सहयोगी, श्रीम. एस. एस. कविठकर कृषि पर्यवेक्षक, सोमकांत आईर कृषि सेवक, समीर धुरी पाट परबवाडा उपसरपंच व सहदेव प्रभू ग्रा.पं. सदस्य हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
श्रीम. एस. एस. कविठकर यांनी या शेतीशाळेचा उद्देश व महत्व अधोरीखित केले व शेतकर्यांना आंबा पिकाबाबत शेतमाल साठवणूक, विक्री व काढणीपश्च्यात प्रकिया उद्योग केंद्र शासन सहाय्यित पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची विस्तृत माहिती दिली. या शेतीशाळेच्या तांत्रिक सत्रात प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथील शास्त्रज्ञ गोपाळ गोळवणकर यांनी आंबा पिकावरील कीड-रोगांची ओळख व नियंत्रण, मोहोर संरक्षण, बदलते हवामान व त्यानुसार करावयाच्या उपाययोजना, कीड -रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन, फवारणीचे तंत्र व कीटकनाशकांचा गरजेनुसार वापर याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
शेतकऱ्यांनी त्यांच्या आंबा बागेत येणार्या समस्या विचारून त्यावर सखोल चर्चा केली. या शेतीशाळेत २५ आंबा शेतकर्यांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कृषि सेवक सोमनाथ आईर यांनी केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

