आणखीकोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 आगीत गुदमरून कृष्णा उर्फ गिरी मयेकर यांचा दुदैवी मृत्यू

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-२६:– साटेली भेडशी सुतारवाडी येथील विवाहित तरुण कृष्णा उर्फ गिरी गोपाळ मयेकर वय वर्षे ४४ या तरुणाचा शेतात गवत जाळण्यासाठी घातलेल्या आगीत गुदमरून दुदैवी मृत्यू होण्याची दुदैवी घटना बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. तो दुपारी घरी न आल्याने सायंकाळी पाच वाजता शोध घेण्यासाठी काही नातेवाईक गेले असता तो मृत अवस्थेत आढळून आला याची माहिती पोलिसांना समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. उशीरा पर्यंत पंचनामा सुरू होता कृष्णा मयेकर याच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
साटेली भेडशी सुतारवाडी येथील कृष्णा मयेकर हा परमे रोड येथे लागून असलेल्या फटी धर्णे यांच्या मालकीच्या जमीनीत वाढलेल्या गवताला आग घालून जमीन साफसफाई करायला सांगितले होते. त्यामुळे दुपारी कृष्णा मयेकर हा शेत जमीन बागायती मध्ये आग लावून गवत जाळणे सुरू होते. मात्र दुपारची वेळ असल्याने वाऱ्यामुळे आग भडकली धूर तसेच आगीच्या ज्वाला यामुळे तो गुदमरून खाली कोसळला. आणी आगीत गुदमरून दुदैवी मृत्यू झाला. यावेळी जवळपास कोणी नाही. शिवाय जमीन मालक देखील त्या ठिकाणी उपस्थित नव्हता.
काही गवताचा भाग जळत शरीरा बरोबर येऊन अंगाचा काही भाग कपडे आगीत जळाले. तो आजुबाजूला आग पेटत होती. शेतात आग घालायला गेलेला गिरी घरी आला नाही म्हणून शोध घेण्यासाठी काही जण सायंकाळी शेतात गेले असता कृष्णा मयेकर हा शेत जमीनीत मृत अवस्थेत आढळून आला.या नंतर याची माहिती पोलीस पाटील तसेच दोडामार्ग पोलिसांना कळविली.

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!