कणकवलीशैक्षणिकसामाजिकसिंधुदुर्ग

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती महिला आघाडी कणकवली तालुका शाखेची कार्यकारिणी जाहीर..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴खारेपाटण​​,दि.२४: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती महिला आघाडी शाखा कणकवली तालुका कार्यकारिणीची सभा शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडीस यांच्या अध्यक्षतेखाली शाळा कलमठ बाजारपेठ येथे आयोजित करण्यात आली होती. सर्वप्रथम तालुका सरचिटणीस सुशांत मर्गज यांनी व्यासपीठावर उपस्थित शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडीस, महिला सेल अध्यक्षा वृषाली सावंत, महिला सेल सचिव रश्मी आंगणे, जिल्हा विभागीय अध्यक्ष महेंद्र पवार, शिक्षक पतपेढी माजी उपाध्यक्ष तथा संचालक आनंद तांबे आदी मान्यवरांचे शाखेच्यावतीने हार्दिक स्वागत ​केले.  त्याचप्रमाणे उपस्थित सर्व महिला तालुका कार्यकारिणी सदस्य, सर्व शिक्षक समिती शिलेदारांचे शब्द सुमनाने स्वागत ​केले.

प्रास्ताविक शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडीस यांनी व्यक्त केले. यामध्ये नविन कार्यकारिणी गठीत करण्यासंदर्भात नियमावली स्पष्ट केली. मागील कार्यकारिणीच्या कार्याचे कौतुक केले. संघटनेच्या विविध उपक्रमांचा व संघटनात्मक बाबींचा आढावा घेण्यात आला. यानंतर महिलाध्यक्षा वृषाली सावंत व सरचिटणीस रश्मी आंगणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

नवीन कार्यकारिणी गठीत करणेबाबत चर्चा करण्यात आली व सूचक अनुमोदक याप्रमाणे सन २०२१ ते २०२४ या कालावधीकरीता अध्यक्षा म्हणून निकिता ठाकूर तर सरचिटणीसपदी नेहा मोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कार्याध्यक्षा सुप्रिया म्हसकर, कार्यालयीन चिटणीस पूजा शंकरदास, कोषाध्यक्षा ऋतुजा जंगले, कणकवली उपाध्यक्षा विशाखा काणेकर, कनेडी उपाध्यक्षा स्नेहा गोठणकर, फोंडा उपाध्यक्षा दर्शना हुंबे, हुमरट उपाध्यक्षा ममता सावंत, तळेरे उपाध्यक्षा आरती कांबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

तसेच तालुका संपर्क प्रमुख संजना चिंदरकर, सल्लागार कल्पना मलये, वृषाली सावंत, प्रणाली निकम, स्वप्नाली रावराणे यांना निवडण्यात आले.

केंद्र संघटक म्हणून कणकवली​-प्राजक्ता सावंत,जानवली​-संगीता सावंत, वागदे​-अपूर्वा सावंत, सावडाव​-स्नेहा सामंत, हळवल​-श्रेया ठाणेकर, घोणसरी​-श्रेया नानचे, भिरवंडे​-निकिता बगळे, नरडवे​-सोनाली कदम, पियाळी​-अनुराधा कदम, साळिस्ते​-साधना लोकरे, डामरे​-तिवरे​-अपेक्षा कदम, बिडवाडी​-सारिका पवार यांची निवड करण्यात आली.

बोर्डवे, कळसुली, हरकुळ बुद्रुक, हरकुळ खुर्द, फोंडा, नाटळ, कासार्डे, खारेपाटण, शेर्पे, नांदगाव, इ. केंद्रांच्या केंद्रसंघटकांची निवड मागावून करण्यात येणार आहे.

शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडीस, विभागीय अध्यक्ष महेंद्र पवार, महिला अध्यक्षा वृषाली सावंत, महिला सरचिटणीस रश्मी आंगणे, संचालक आनंद तांबे, तालुका सरचिटणीस सुशांत मर्गज यांनी मनोगत व्यक्त केले. महिला सरचिटणीस रश्मी आंगणे यांनी सर्वांचे तालुका शाखेच्यावतीने आभार व्यक्त केले.

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता  कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!