कोकणातील बीएसएनएल सेवा सुरळीत करा !
*🛑कोकणातील बीएसएनएल सेवा सुरळीत करा !*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- २०:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणातील बीएसएनएलच्या सेवा वाढविण्याबरोबरच सेवेत सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांनी दूरसंचारमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे केली आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ४- जी सेवेला मोठी मागणी आहे. मात्र, १५० मंजूर ४-जी टॉवरपैकी ८७ टॉवरचे काम पूर्ण झाले असून फक्त १० टॉवर ४-जी सेवा देत आहेत. याकडे राणे यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले. यावेळी बीएसएनएल सेवा कोकणात अधिक मजबूत करण्यासाठी तातडीने प्रयत्न करू संबंधितांना तशा सूचना देण्यात येतील, असे मंत्र्यांनी सांगितले.
निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात डोंगराळ आणि कठीण प्रदेशांचा समावेश आहे. या जिल्ह्यात चांगली सेवा देणारी बीएसएनएल ही एकमेव मोबाईल कंपनी आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सर्वाधिक महसूलही मिळवून देतो. मात्र, मनुष्यबळ आणि निधीअभावी सेवेत अनेक त्रुटी आहेत. जिल्हयाच्या ग्रामीण भागात ४-जी सेवेला मोठी मागणी आहे. केबल बिघाडामुळे किंवा इतर कारणांमुळे सेवा खंडित झाल्यास मनुष्यबळाअभावी व्यत्यय येतो. बीएसएनएल वापरकर्त्यांनी सेवेच्या गतीबद्दल तक्रारी केल्या आहेत. केबलच्या देखभालीसाठी नेमलेला संबंधित आपले काम व्यवस्थित करत नसल्याच्या तक्रारी आहेत. संबंधितांना सेवेत सुधारणा करण्यासाठी, बीएसएनएल सिंधुदुर्गसाठी मनुष्यबळ आणि निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना द्याव्यात.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

