वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय !
*🛑वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय !*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- २०:-* वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वे मार्गाचे प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. आता बांधकाम जलदगतीने मार्गी लावण्यासाठी वैयक्तिकरित्या आपण लक्ष घालावे, अशी आग्रही मागणी माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
यावेळी खासदार राणे यानी सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकावरील सुविधा तसेच या स्थानकावर ४ एक्सप्रेसना थांबा मिळण्याचीही मागणी केली. कोल्हापूर मार्गाबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत यावेळी रेल्वेमंत्र्यांनी आश्वासीत केले.
राणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, २०१६ रोजी घोषणा झालेला प्रस्तावित वैभववाडी- कोल्हापूर (आचिर्णे जंक्शन) रेल्वे लाईन निर्मितीला चालना देण्यात यावी वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे लाईन बांधण्याची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी २०१६ मध्ये केली होती. तेव्हापासून या प्रकल्पाचा पाठपुरावा करत आहे. सरकारने या प्रकल्पासाठी आवश्यक तरतूद केली, परंतु रेल्वे बोर्डाने त्याला मान्यता दिलेली नाही. त्यामुळे हा प्रकल्प मागे पडत आहे.
वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाची लांबी १०७ किमी आहे. कोल्हापूर- वैभववाडी सेक्शनचे बांधकाम केवळ कोकण रेल्वेसाठीच नव्हे, तर महाराष्ट्राच्या क्षेत्रासाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी ‘गेम चेंजर ठरणारे आहे हे महाराष्ट्राच्याा किनारपट्टीच्या प्रदेशाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडेल, किनारपट्टीच्या प्रदेशात बंदरे आणि बंदरांचा सीमावर्ती भागातून किनाऱ्यापर्यंत मालाची वाहतूक सोपी होईल.
*सिंधुदुर्ग स्थानकात चार गाड्यांना थांबा द्या!*
सिंधुदुर्गनगरी हे जिल्हा मुख्यालयात स्थानक आहे. प्रशासकीय केंद्र म्हणून महत्व असूनही या स्थानकावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. सिंधुदुर्ग स्टेशनवर पीआरएस सुविधा उपलब्ध करून द्यावी. या स्टेशनसाठी अमृत भारत स्टेशन योजना आणि एक स्टेशन-एक उत्पादन योजनेची अंमलबजावणी करावी स्थानकावर प्रवाशांसाठी एलईडी इंडिकेटर आणि बारमाही सावलीयुक्त प्लॅटफॉर्म उभारावा. तसेच सिंधुदुर्गातून धावणाऱ्या ११०९९/ १११०० या एलटीटी-मडगाव-एलटीटी एक्स्प्रेस, ०११३९/ ०११४० नागपूर- मडगाव- नागपूर एक्स्प्रेस, १६३३६/ १६३३७ गांधीग्राम- नागरकोईल एक्स्प्रेस, २२१४९/ २२१५० पुणे-एर्नाकुलम-पुणे एक्स्प्रेसना या स्थानकावर थांबा द्यावा, अशी मागणीही नारायण राणेंनी केली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

