विजेचा धक्का बसल्याने कंत्राटी कामगाराचा मृत्यू
सावंतवाडी,दि.०८ :- माडखोल येथे विद्युत खांबावर काम करत असताना कंत्राटी कामगार विजेचा शॉक बसल्याने कामगार ठार झाला आहे.सायंकाळी ४ वाजता ही घटना घडली. रुपेश अनंत डांगी (वय३०) राहणार महादेवाचे केरवडे ता. कुडाळ असून त्याला त्वरित उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हारुग्णालय येथे दाखल केले होते मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

