जिल्हयात आंबा भरपाई न मिळाल्यास उपोषण
*🛑जिल्हयात आंबा भरपाई न मिळाल्यास उपोषण*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴ओरोस, दि- ०७:-* सिंधुदुर्गात १६ एप्रिल ते १५ मे या कालावधीत वेगाच्या वाऱ्याने आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे होऊनही भरपाई मिळालेली नाही. येत्या आठ दिवसांत नुकसान भरपाई जमा न झाल्यास २३ डिसेंबरला जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्यामसुंदर राय यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हा कृषी अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, २०२३-२४ मधील पुनर्रचि पुनर्रचित हवामान आधारित फळपीक योजनेंतर्गत वेंगुर्ले तालुक्यातील महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या आंबा पिकांचे वेगाच्या वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत शेतकऱ्यांच्या बागेत जाऊन रितसर पंचनामे झाले. मात्र, अनेकदा पत्र देऊनही शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. १६ एप्रिल ते १५ मेदरम्यान वेगाच्या वाऱ्यांमुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्याचे जिल्हा विमा प्रतिनिधी, वेंगुर्ले तालुका कृषी सहायक यांनी बागेत जाऊन पंचनामे केले होते. परंतु विमा कंपनीने जमा केलेल्या नुकसान भरपाईमध्ये तापमान व पावसाची भरपाई दिसत आहे. त्यामध्ये वेगाच्या वाऱ्याने झालेली नुकसान भरपाई जमा झालेली दिसून येत नाही. येत्या आठ दिवसांत रितसर पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाई जमा न झाल्यास २३ डिसेंबरला जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, अशा इशारा राय यांच्यासह जयवंत सावंत, संतोष शेटकर, पराग सावंत आदींनी दिला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

