आरोग्यकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

सिंधुदुर्गात आजपासून ‘क्षयरोग’ शोधमोहीम

*🛑सिंधुदुर्गात आजपासून ‘क्षयरोग’ शोधमोहीम*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- ०७:-* राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ७ डिसेंबरपासून १०० दिवसीय क्षयरुग्ण शोधमोहीम राबविण्यात येणार आहे.ही मोहीम २४ मार्च २०२५ ‘जागतिक क्षयरोग दिन’ रोजी संपणार आहे या मोहिमेचा उद्देश हा जास्तीत जास्त क्षयरुग्ण शोधून त्यांना उपचारावर आणणे, क्षयरुग्णांचा मृत्यूदर कमी करुणे, नवीन क्षयरुग्णांचे प्रमाण कमी करणे, क्षयरोगाविषयी जनजागृती करणे, समाजातील क्षयरोगाविषयी असलेले गैरसमज दूर करणे, क्षयरुग्णांना ‘पंतप्रधान क्षयमुक्त भारत’ अभियानांतर्गत निक्षयमित्र यांच्याकडून पोषण आहार किटचे वाटप करणे असा आहे. १०० दिवसीय क्षयरोग मोहीम देशभरातील ३४७ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत असून यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हयाचा समावेश करण्यात येत आहे. या मोहिमेत जोखीमग्रस्त भाग निवडून त्यांचे सर्वेक्षण करणे, निक्षय शिबीर घेण्यात येणार आहे. अनाथाश्रम, वृद्धाश्रम, उद्योग संस्था, निवासी शाळा, कारागृह येथे क्षयरोग तपासणी शिबीर तसेच स्थलांतरित, ऊसतोडणी कामगार, उच्च जोखीमग्रस्त भाग व वंचित घटक यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यातील संशयित व्यक्तीची धुंकी तपासणी व क्ष-किरण तपासणी जिल्हा रुग्णालय सिंधुदर्ग तसेच तालुका स्तरावर करणेचे नियोजन करणेत आले असुन याचा लाभ जनतेने घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सकांनी केले आहे. क्षयरोगाची लक्षणे ही दोन आठवड्यापेक्षा जास्त खोकला, दोन आठवड्यापेक्षा जास्त ताप, रात्री घाम, थुकीतून रक्त पडणे, छातीत दुखणे, श्वसनास त्रास होणे, वजनात घट, भूक मंदावणे, थकवा, अशक्तपणा जाणवणे, मानेवर किंवा शरीरावर इतर ठिकाणी गाठी येणे ही लक्षणे आढळल्यास नजीकच्या शासकीय आरोग्य केंद्रात मोफत तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्यांनी केले आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!