कोकणरत्नागिरीशासकीयसामाजिक

रत्नागिरी जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी केली चिपळूणच्या सांस्कृतिक केंद्राची केली पाहणी..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण,दि.२२: रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी काल अचानक चिपळूण नगरपालिकेला भेट दिली. विविध विषयांवर मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांच्याशी चर्चा केल्यानंतर नगरसेवकांशी त्यांनी संवाद साधला. चिपळूण पालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी करावयाच्या विविध उपाययोजना यावर सविस्तर चर्चा झाली. यानंतर त्यांनी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राला भेट दिली. ठेकेदार, अभियंता यांच्याकडून सांस्कृतिक केंद्राच्या कामाबाबतची माहिती जाणून घेतली. सांस्कृतिक केंद्र सुरू करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन करू, असेही त्यांनी सांगितले.

यानंतर गोवळकोट येथील पुनर्वसनासंदर्भात जागेची पाहणीही त्यांनी केली. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या चिपळूण दौऱ्यामुळे शहरातील विकासाची अनेक दालने सुरू होतील, अशी अपेक्षा आहे. नगराध्यक्षा सुरेखा खराडे यांच्यासह सर्व नगरसेवक या वेळी उपस्थित होते.

रंगकर्मी संतोष केतकर, मंगेश बापट, संजय कदम यांनीही सांस्कृतिक केंद्राबाबत जिल्हाधिकारी यांची भेट घेतली.

*_💥पोल्ट्री साहित्याच्या शोधात आहात? चिंता सोडा..💥_*

🌈आमच्या दर्जेदार, टिकाऊ व माफक दरातील पोल्ट्री साहित्याचा अनुभव घ्या! आणि सोडा सुटकेचा निश्वास..😊

   _*🐓🔥 सिश्रायु पोल्ट्री सर्व्हिस 🔥🐓*_

_*💫आमच्याकडे पोल्ट्री साठी लागणारी जाळी, खाद्य भांडी, पाणी भांडी, ताडपत्री, भुसा ढवळण्याची मशीन इत्यादी साहित्य माफक दरात मिळेल..*_

*🤷🏻‍♂️ संपर्क ⬇️*
श्री. अमित देसाई,
निळेली (माणगाव)
तालुका. कुडाळ, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*🤷🏻‍♀️ मोबाईल नंबर ⬇️*
_*📱9403559599*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!