युवकाला मारहाणप्रकरणी सहाजणांना सशर्त जामीन

*🛑युवकाला मारहाणप्रकरणी सहाजणांना सशर्त जामीन*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०३:-* जमाव करून युवकाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी अटक केलेल्या संशयित सहा जणांना सावंतवाडी न्यायालयाने प्रत्येकी २५ हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला. संशयितांतर्फे अॅड. परशुराम चव्हाण यांनी बाजू मांडली. ही मारहाणीची घटना २७ नोव्हेंबरला रात्री सावंतवाडी शहरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गावरील मोती तलावाच्या काठाजवळ घडली होती. या मारहाणीत युवक रॉयस्टन जॉन डिसोजा जखमी झाला होता. किरकोळ कारणाच्या वादातून विरोधकांनी जमाव करून मारहाण केल्याची तक्रार जखमी डिसोजा यांच्या नातेवाईकाने पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार संशयित उज्वल महेश डाफले, तुषार विनायक तुळसकर, रितेश राजेश सावंत, ओमकार अनिल गावकर, दर्शन नरसिंह गवस व प्रभू साबान्ना कामनेट्टी (सर्व रा. सावंतवाडी) व अन्य अनोळखी अशा १६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील मुख्य संशयित सहाजणांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले होते. अधिक तपासासाठी सहाही संशयितांना पोलीस कोठडीची मागणी पोलिसांनी न्यायालयात केली होती. अॅड. चव्हाण यांनी या गुन्ह्याकामी न्यायालयात केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने पोलीस कोठडी फेटाळून लावत न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर सहाही संशयितांच्या जामिनासाठी अर्ज दाखल केला. त्यावर सुनावणी झाली.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!