कुडाळकोकणमहाराष्ट्र

जमीन खरेदी व्यवहारात ५० लाखाची फसवणूक

*🛑जमीन खरेदी व्यवहारात ५० लाखाची फसवणूक*

*🛑दिल्लीतील तरुणाची फिर्याद : दाम्पत्यावर गुन्हा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कुडाळ, दि-३०:-* जमीन खरेदीपोटी नोटरी करून ५० लाख रुपये रक्कम घेऊन स्वतःच्या फायद्यासाठी वापरली आणि ती जमीन दुसऱ्याच व्यक्तीला विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपली पन्नास लाख रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद रोतांश लख्मीचंद तयाल (४७, रा. दिल्ली) यांनी पोलिसांत दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित सोनिया संदीप चव्हाण (४२) व संदीप उत्तम चव्हाण (४२, दोन्ही रा. शिवडाव-कणकवली) या दाम्पत्याविरुध्द गुन्हा दाखल केला. ही घटना ७ मार्च ते ९ सप्टेंबर २०२४ या मुदतीत घडली. यातील संशयित सोनिया चव्हाण व संदीप चव्हाण यांनी एकमेकांच्या संगनमताने व सहाय्याने रोतांश लख्मीचंद तयाल यांच्याशी सावंतवाडी तालुक्यातील वाफोली येथील एका जमीन खरेदीबाबत व्यवहार करण्याचे निश्चित केले. त्या गावातील जमीन सर्व्हे क्र. ४२ हिस्सा क्र. १, २, ३, सर्व्हे क्र. ५७ हिस्सा क्र. २, सर्व्हे क्र. ४०, ४१, ६१, ६२, ५५, ५३ या जमिनीमधील ६५ एकर जमीन अठरा लाख रुपये एकर या दराप्रमाणे खरेदी करून देण्याचे त्या दोघांनी कबूल केले. त्यानुसार तशी नोटरी करून रोतांश तयाल यांच्याकडून खरेदीच्या व्यवहारापोटी पन्नास लाख रुपये घेतले. मात्र, ही रक्कम सोनिया चव्हाण व संदीप चव्हाण या दोघांनी आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी वापरली. तसेच या जमिनीच्या खरेदी व्यवहाराबाबत नोटरीमार्फत लिहून देऊनही त्या जमिनीचे खरेदीखत रोतांश तयाल यांच्याशी न करता त्या जमीन मिळकतीपैकी सर्व्हे क्र. ४० हिस्सा क्र. १, सर्व्हे क्र. ४२ हिस्सा क्र. १ व सर्व्हे क्र. ६२ हिस्सा क्र. २ ही जमीन मे. वेधीकंश वेलनेस प्रा. लि. तर्फे साईनाथ बाबी पटेकर यांना विक्री केली. त्यानंतर तयाल यांनी आपली फसवणूक झाल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल केली. संशयित सोनिया चव्हाण व संदीप चव्हाण या दोघांनी जमीन व्यवहाराबाबत एकमेकांच्या संगनमताने व सहाय्याने पन्नास लाख रुपये घेऊन ती स्वतःच्या फायद्यासाठी वापरून फसवणूक केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१६ (२), ३१८ (४), ३ (५) प्रमाणे त्या दोघांवर २६ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम तपास करत आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!