प्रवासी राजा दिन उपक्रमाचे आगारनिहाय वेळापत्रक जाहीर
*🛑प्रवासी राजा दिन उपक्रमाचे आगारनिहाय वेळापत्रक जाहीर*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-३०:-* राज्यातील प्रत्येक आगारात प्रवासी राजा दिन आणि कामगार पालक दिन साजरा करण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रवाशांच्या समस्या, तक्रारीवजा सूचना यांचे स्थानिक पातळीवर जलद गतीने निराकरण होण्याच्या उद्देशाने प्रत्येक आगारात दर सोमवारी व शुक्रवारी हा दिन साजरा करण्यात येतो. याच अनुषंगाने रा. प. सिंधुदुर्ग विभागातील आगारात प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन कार्यक्रमाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सिंधुदुर्गातील प्रत्येक आगारात होणाऱ्या प्रवासी राजा आणि कामगार पालक दिनाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे : वेंगुर्ले – ६ डिसेंबर, मालवण ९ डिसेंबर, सावंतवाडी १३ डिसेंबर, कणकवली – १६ डिसेंबर, देवगड २० डिसेंबर, विजयदुर्ग – २३ डिसेंबर, कुडाळ २७ डिसेंबर, वेंगुर्ले ३० डिसेंबर. या वेळापत्रकानुसार एसटी आगारात सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत प्रवासी राजा दिन साजरा करण्यात येणार आहे. सदर वेळेत प्रवासी तसेच प्रवासी संघटना, शाळा आणि महाविद्यालये आपल्या समस्या, तक्रारी, सूचना लेखी स्वरुपात त्या ठिकाणी मांडू शकतात व प्रवासी राजा दिन झाल्यानंतर दुपारी ३ ते सायं. ५ या वेळेत कामगार पालक दिन साजरा करण्यात येणार आहे.
सदर वेळेत संघटना व रा. प. कर्मचाऱ्यांच्या रजा मंजुरी, कर्तव्यासंबंधी, वेळापत्रकासंबंधी व प्रमादीय कारवाई आदी वैयक्तिक बाबतीतील प्रश्न, तक्रारी लेखी स्वरुपात घेऊन तक्रारीचे तात्काळ निराकरण करू शकतात. तरी सर्व प्रवासी, रा. प. कामगारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक श्री. प्रल्हाद घुले यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

